नांदेडमधून अपहरण केलेली मुलगी सापडली; धक्कादायक कारण समोर…

नांदेड: नांदेड शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे दोन युवकांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. नांदेड पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि अपहरण झालेल्या मुलीचा सुखरूप सुटका केली.

पोलिस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अपहरण झालेली मुलगी रेल्वे स्टेशन परिसरातच वास्तव्यास असून, ती भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होती. आरोपी आणि पीडित मुलीची पूर्वीपासून ओळख होती. अपहरणाच्या दिवशी आरोपींनी मुलीशी वाद घातला होता. वादानंतर एक आरोपी आपल्या मित्रासोबत आला आणि दोघांनी मिळून तिला दुचाकीवरून बळजबरीने पळवून नेले. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने तपासाला लागले. पोलिसांचा दबाव वाढत असल्याने आरोपींनी मुलीला सोडून पळ काढला. यानंतर पोलिसांनी ती मुलगी सुखरूप शोधून काढली.

संबंधित मुलीवर कोणताही अत्याचार झाला नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी एक आरोपीला अटक केली असून, दुसऱ्या आरोपीची ओळख पटली आहे आणि त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले.

Video: पुणे शहरातून भीक मागण्यासाठी चिमुकलीचे अपहरण; टोळीचा पर्दाफाश…

हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे 5 जणांकडून अपहरण, बेदम मारहाण…

श्रीमंत घरातील मुलीच्या अपहरणाचा डाव फसला; पावतीमुळे अलगद अडकले…

साखरपुडा पार पडल्यानंतर घरी निघालेल्या युवतीचे रस्त्यातच अपहरण…

बीड हादरलं! युवकाचे अपहरण करून झाडाला बांधून बेदम मारहाण अन् मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!