
एकतर्फी प्रेम! मैत्रिणीने भेटण्यासाठी बिल्डिंगच्या टेरेसवर बोलावलं अन्…
मुंबईः एकतर्फी प्रेमातून झालेल्या वादानंतर अल्पवयीन मुलाने आपल्या मैत्रिणीला इमारतीच्या टेरेसवरून ढकलून तिची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे भांडूप पश्चिम परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
संबंधित अल्पवयीन मुलाला नुकत्याच पार पडलेल्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले होते. यामुळे तो आधीच मानसिक तणावाखाली होता. या काळात त्याच्या एका मित्राने त्याची चेष्टा केल्याने तो अधिक अस्वस्थ झाला. अशा मनःस्थितीत असतानाच त्याच्या मैत्रिणीने त्याला भेटण्यासाठी बिल्डिंगच्या टेरेसवर बोलावले होते. दोघांमध्ये बोलणे सुरू असताना मुलीने मुलाला डेटिंगसाठी विचारले. मात्र मुलाने तिला नकार दिला. त्यानंतर दोघांमध्ये वाद वाढला आणि रागाच्या भरात त्या अल्पवयीन मुलाने आपल्या मैत्रिणीला बिल्डिंगच्या टेरेसवरून ढकलून दिले. या मैत्रिणीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रकरणी भांडूप पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी भांडूप पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरोधात कलम 103 (1), 238 बी एन एस 2023 कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, पुढील तपास भांडूप पोलीस करत आहेत.
धक्कादायक! पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून वर्गातील मुलाने केली महिलेची हत्या…
एकतर्फी प्रेमाच्या जाचाला कंटाळलेल्या युवतीने घेतला जगाचा निरोप…
एकतर्फी प्रेम! बीएचएमएसच्या विद्यार्थिनीची धमक्यांना कंटाळून आत्महत्या…
एकतर्फी प्रेमातून नगरसेवकाच्या मुलीची कॉलेजमध्ये हत्या…
एकतर्फी प्रेम! पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न राहिले अधुरे…
एकतर्फी प्रेम! लग्नाच्याच दिवशी नवरीने घेतला जगाचा निरोप…

