पुणे जिल्हा! तलाठ्याची युवतीसह आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले, पत्नीचे अनैतिक संबंध…

पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात तलाठी आणि महाविद्यालयीन युवती मृतावस्थेत आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. दोघांचे मृतदेह १२०० फूट खोल दरीत आढळले आहेत. याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामचंद्र साहेबराव पारधी (वय 40) आणि रूपाली संतोष खुटाण (वय अंदाजे 20) असे मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत. मृत रामचंद्र हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत होते. रुपाली ही आंबोली येथील महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. याबाबतची एक सुसाईड नोटही पोलिसांच्या हाती लागली आहे. रामचंद्र पारधी यांनी आपल्या पत्नीसह तिच्या घरच्यांविरोधात गंभीर आरोपही केले आहेत.

रामचंद्र पारधी यांनी मृत्यूआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्नी, तिच्या चुलत बहिणी, त्यांचे पती एकूण ११ जणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटलं आहे. या सर्वांनी आपल्याला मानसिक त्रास दिल्यामुळे जगण्याची इच्छा नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. पत्नी लायकीची नाही. ती घरातील सर्व बाबी फोन करून आणि प्रत्यक्षात इतरांना सांगते. आपण किती चांगलं आणि नवरा कसा वाईट आहे, असे ती नातेवाईकांना सांगत असे. तिने माझी नातेवाईकांमध्ये बदनामी केली. मी आठ वर्षे सगळं सहन केलं.

पत्नीचे तिच्या गावातील एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे तिने आपल्याला कधीच मानसिक आणि शारीरिक सुख दिले नाही. पत्नीने आणि तिच्या नातेवाईकांनी केलेल्या बदनामीमुळे जगण्याची इच्छा नाही. माझ्या मृत्यूस सर्वांना जबाबदार धरून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवाय, या नोटमध्ये त्यांनी आई वडील, बहीण-भाऊ आणि मुलांची माफी मागितली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ISHWARII💅 (@ishwariii16)

पुणे जिल्ह्यात तलाठी अन् महाविद्यालयीन युवतीचा आढळला मृतदेह…

महिला कॉन्स्टेबलने बेफामपणे ट्रीपलसीट जाणाऱ्या युवतींना पकडले अन् सुनावले…

पुणे! युवकाने डिप्रेशनच्या कारणातून केला आयुष्याचा शेवट; ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले…

महाविद्यालयीन युवती संध्या पाठक हिच्या आत्महत्येचं खरं कारण समोर…

पुणे जिल्ह्यातील युवती अन् नांदेडमधील युवक; शरीरसंबंधानंतर युवतीला सोडून पळाला…

पुणे जिल्ह्यात दिव्यांग युवकाचा खून; बंद गाडी मध्ये आढळला मृतदेह…

पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना; युवतीला होणारा नवरा नव्हता पसंत…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!