कोल्हापूर! लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीला तडफडून मारलं…

कोल्हापूर: कोल्हापुरातील सरनोबतवाडी परिसरात एका युवकाने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युवतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने मंगळवारी (ता. ३) दुपारी धारदार चाकुने केलेल्या हल्ल्यात युवतीचा तडफडून मृत्यू झाला आहे. पोलिस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

समीक्षा भरत नरसिंगे (वय २३, रा. दत्त मंदिर, जय भवानी गल्ली, कसबा बावडा) असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे. सतीश यादव (रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) असे हल्लेखोर युवकाचे नाव आहे. आरोपीने मृत समीक्षा हिच्याकडे लग्नाची मागणी घातली होती. पण तिने लग्नाला नकार दिला. याच रागातून आरोपीनं हे भयावह कृत्य केल्याचं प्राथमिक तपासात समोर आले आहे.

दोघांनी ५ महिन्यांपूर्वी अन्य एका मैत्रिणीला सोबत घेत एक इव्हेंट कंपनी सुरू केली होती. तिघेही एकत्र राहत होते. पण, गेल्या दोन महिन्यांपासून काम नसल्याने त्यांना घरभाडे थकले होते. दरम्यान, सतीश यादव याने युवतीला लग्नाची मागणी घातली होती. पण तिने लग्नाला नकार दिला होता. चार दिवसांपूर्वी सतीश आणि समीक्षामध्येही वाद झाला होता. या वादानंतर समीक्षा व दुसरी मैत्रीण फ्लॅट सोडून गेली.

दरम्यान, दोघी फ्लॅटवरील आपलं साहित्य घेऊन जाण्यासाठी मंगळवारी फ्लॅटवर आल्या होत्या. यावेळी सतीशने समीक्षाशी वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर सतीशने चाकूने भोसकून समीक्षाचा खून केला. यानंतर त्याने फ्लॅटला बाहेरून कडी लावून पसार झाला. सतीशने समीक्षावर एकच वार केला होता. पण तो इतका तीव्र होता की चाकू समीक्षाच्या बरगडीतच अडकला. आरोपीने बाहेरून कडी लावल्याने समीक्षाचा मैत्रीणीच्या डोळ्यादेखत तडफडून मृत्यू झाला. हा प्रकार घडल्यानंतर समीक्षाच्या मैत्रिणीने तातडीने या घटनेची माहिती अन्य एका मित्राला आणि समीक्षाच्या बहिणीला दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

धुळे हादरलं! जवानाला कॉलेजचं प्रेम पुन्हा घावलं अन् पत्नीला संपवलं…

हृदयद्रावक! स्नेहसंमेलनामध्ये गाणं म्हणत असतानाच सर कोसळले अन्…

धुळे! जवानाने केली पत्नीची निर्घृण हत्या…

हृदयद्रावक! बापाने वाढदिवशी दिला वैष्णवीच्या चितेला अग्नी…

कोल्हापूर! बहिणीची छेड काढल्याच्या रागातून मित्राची निर्घृण हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!