
स्वारगेट एस.टी. स्टँन्ड परिसरात प्रवाशांचे सोन्याचे दागीने चोरी करणारी महिला जेरबंद…
पुणेः स्वारगेट एस.टी. स्टँन्ड परिसरात प्रवाशांचे सोन्याचे दागीने चोरी करणारी महिला जेरबंद करण्यात स्वारगेट पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी मुद्देमालासह महिलेला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
स्वारगेट पोलिस ठाणे हदीतील स्वारगेट एसटी स्टँड व पी एम पी एम एल बस स्टॉप येथे चोरीच्या घटना अधुन मधुन घडत असल्याने युवराज नांद्रे, परिष्ठ पोलिस निरीक्षक, स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर यांनी स्वारगेट पोलिस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सुचना देवून सदर भागात गर्दीचे वेळी गुन्हे प्रतिबंधक गस्त करणेबाबत आदेशित केले होते.
सहा पोलिस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलिस अंमलदार सुजय पवार, संदिप घुले हे १६/०५/२०२५ रोजी १६/०० या सुमारास स्वारगेट एसटी स्टँन्ड परिसरातध्ये गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना पो सुजय पवार व संदीप घुले यांना त्यांचे गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली कि स्वारगेट एसटी स्टॅन्ड जवळील शिवाजीनगर पीएमपीएल बस स्टॉप येथे एक महिला चोरीचे सोने विक्री करण्यासाठी आली आहे. त्यांनी सदर बातमीचा सहा. पो. निरीक्षक राहुल कोलंबीकर यांनी दिली असता त्यांनी सदर बातमीबाबत वरिष्ठांना माहिती दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.
सपोनि राहुल कोलंबीकर यांनी दोन पंच व दोन महिला अंमलदार यांना बोलावून घेवून वरील स्टाफचे मदतीने बातमीचे ठिकाणी जावून बातमीतील वर्णनाची महिला दिसून आली. तिला स्टाफचे मदतीने ताब्यात घेतले. भाग्यश्री जितेश कसबे (वय ४० वर्षे रा. मारुती मंदीरासमोर कजगाव गावठाण विश्रांतवाडी पुणे मुळगाव विकासनगर लातूर) असे तिचे नाव आहे. दोन पंचासमक्ष तिची अंगझडती घेतली असता तिचे पर्समध्ये सोन्याचे दागिने मिळून आले. तिस सदर दागिन्यांसह पुढील कारवाईकामी पंचासह स्वारगेट पोलिस स्टेशन येथे आणून त्यांचे ताब्यात मिळालेल्या सोन्यांच्या दागिन्यांबाबत अधिक तपास केला असता तिचेकडे सदर सोन्यांचे दागिनेबाबत कोणत्याही प्रकारची खरेदीची पावती मिळून आली नाही. अधिक कसून तपास केला असता तिने सांगितले की, मागील महिन्यांपासून मी स्वारगेट एसटी स्टॅन्ड परिसरामध्ये गर्दीमध्ये बसमध्ये चढणाऱ्या प्रवासी महिलांचे अंगावरील दागिने चोरी केलेले सदर दागिने विक्री कामी घेवुन निघाले होते. माझ्याकडे पावती नसल्यामुळे ते दागिने कोणी विकत घेत नाही असे सांगितले.
सदर दागिन्यांचे वर्णनावरुन स्वारगेट अभिलेखाची पडताळणी केली असता सदर दागिन्यांचे वर्णनावरून सदर दागिने हे स्वारगेट पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले असून सदर महिलेने स्वारगेट पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर १२७/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर महिला आरोपीकडुन तपासादरम्यान २,७०,०००/- रुपये किंमतीचे ३० ग्रॅम वजनाचे (३ तोळे सोन्याचे दागीने तपासा दरम्यान जप्त करुन स्वारगेट पोलिस स्टेशन येथे दाखल असलेले सोने चोरीचे एकुण ०३ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची कामगिरी ही अमितेश कुमार पोलिस आयुक्त, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा सह-आयुक्त, पुणे शहर, राजेश बनसोडे अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, स्मार्तना पाटील, पोलिस उपआयुक्त, परिमंडळ- २. पुणे शहर, राहुल आवारे सहा. पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज नांद्रे, स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर यांच्या आदेशान्वये तपास पथकाचे अधिकारी राहा. पोलिस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलिस उप-निरीक्षक रविंद्र कस्पटे, पो. हवा अभुवा मोराळे, हर्षल शिंदे, पो/अं. सुजय पवार, संदीप घुले, फिरोज शेख, रमेश चव्हाण, दिपक खेंदाड, प्रशांत टोणपे, हनुमंत दुधे यांनी एकत्र मिळून केली आहे.
पुणे! वैष्णवीचा मृत्युपूर्वी मैत्रिणीसोबत संवाद; ऑडिओ क्लिप व्हायरल…
खुनाचा बदला! पुणे गुन्हे शाखा युनिट ०२ने आरोपीला पिस्टलसह घेतले ताब्यात…
पुणे शहरात शिंदे गटाच्या नेत्याच्या कारवर मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार…
पुणे! बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींना सापळा रचून पकडले अन् काढली वरात; पाहा Video…
Video: पुणे शहरात धुमाकूळ घातलेल्या कोयता गँगची पोलिसांनी काढली वरात…

