
नाशिक! मित्राच्या मुलीला घरी घेऊन गेल्यानंतर पॉर्न व्हिडीओ दाखवला अन्…
नाशिक: नाशिक शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाने आपल्या मित्राच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीने पीडित मुलीला पॉर्न व्हिडीओ दाखवत तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
पीडित मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. बोर्ड परीक्षेत तिने चांगले गुण संपन्न केले होते. याच दिवशी आरोपीने पीडित मुलीचे कौतुक करण्याच्या बहाण्याने आपल्या घरी घेऊन गेला. याठिकाणी आरोपीने मुलीला पॉर्न व्हिडीओ दाखवत तिच्याशी लैंगिक चाळे केले. शिवाय, त्याने पीडितेकडे शरीरसंबंधाची मागणी केली.
दरम्यान, पीडितेच्या वडिलांचा अचानक फोन आला. तसेच त्यांनी मुलीला घरी येण्यास सांगितलं. यानंतर संशयित आरोपीने पीडितेला तिच्या घरी नेऊन सोडले. घरी आल्यानंतर पीडित मुलीनं तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला. मुलीसोबत घडलेला प्रकार ऐकून तिच्या आईला धक्का बसला तिने तातडीने आडगाव पोलीस स्टेशन गाठून पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. आडगाव पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
हृदयद्रावक! नाशिकमध्ये भावासमोरच बहिणीने सोडला प्राण…
नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढतेय गुन्हेगारी; युवकाचा खून…
नाशिक! सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची मन हेलावून टाकणारी चिठ्ठी…
नाशिकमध्ये दोन सख्ख्या भावांची कोयत्याचे सपासप वार करून हत्या…
नाशिक हादरलं! मुलीनं लव्ह मॅरेज केलं म्हणून वडिलांनी आईला संपवलं…

