
Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…
श्रीनगरः जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात कर्नाटकातील मंजुनाथ यांनाही दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून ठार केले. याबाबत मंजुनाथ यांच्या पत्नीने हृदय पिळवटून टाकणारा थरार सांगितला आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले कर्नाटकचे व्यापारी मंजुनाथला त्यांच्या पत्नी पल्लवीसमोर दहशतवाद्यांनी गोळ्या मारल्या. प्रसारमाध्यमांशी बोलताना पल्लवी म्हणाली की, ‘मी दहशतवाद्यांना सांगितले की त्यांनी माझ्या पतीला मारले, मलाही मारून टाका…यावर दहशतवादी म्हणाले, आम्ही तुम्हाला मारणार नाही, जाऊन मोदींना हे सांगा…ही भयानकता तू पंतप्रधान मोदींना सांगावी, यासाठी तुला सोडून देतोय, असे दहशतवादीने सांगितले.’
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर मृत मंजुनाथ आणि पल्लवी यांचा शेवटचा व्हिडीओही समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दाम्पत्य जम्मू-काश्मीरमधील विविध पर्यटक स्थळांची माहिती देत आहे.
J&K : पहलगाम में आतंकी हमले में मारे गए कर्नाटक के मंजूनाथ की आखिरी Video 💔
पत्नी पल्लवी ने एक चैनल को बताया– “मैंने आतंकियों से कहा, मेरे पति को मार दिया, मुझे भी मार दो”
इस पर आतंकी बोले– “तुम्हें नहीं मारेंगे, जाओ मोदी को बता दो” pic.twitter.com/ZlqUYiNEwg
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) April 22, 2025
जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर विदारक दृश्यं समोर आली आहेत. पर्यटक आणि स्थानिकांवर झालेल्या या गोळीबारात, लग्नानंतर जम्मूमध्ये फिरायला आलेल्या जोडप्यालाही टार्गेट करण्यात आले. या गोळीबारात मृत झालेल्या पतीच्या शेजारी खिन्न मनाने बसलेली पत्नी पाहून उपस्थितांच्या काळजात धस्स झाले. या महिलेने दहशतवाद्यांनी तिच्या पतीला केवळ मुस्लिम नसल्याचे सांगितल्यामुळे गोळ्या घातल्याचे म्हटले आहे.
पहलगाममध्ये पोलिसांच्या वेषात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना आपला निशाणा बनवला. पर्यटकांची नावे विचारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या वेळी एक नवविवाहित जोडपेदखील दहशतवाद्यांच्या हल्लातून सुटले नाही. या जोडप्यातील पुरुषाला आधी त्याचा धर्म विचारला आणि मग त्याला गोळ्या घालण्यात आल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले. ही महिला आपल्या पतीला वाचवण्यासाठी लोकांना आवाहन करत होती. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी खिन्न मनाने ती मृत पतीच्या शेजारी बसली.
दरम्यान, दहशतवादी हल्ल्यातील जखमींमध्ये राजस्थानच्या पर्यटकांसह महाराष्ट्राच्याही काही पर्यटकांचा समावेश आहे. तसेच काही स्थानिक नागरिकही यात जखमी झाले आहेत. सुरक्षा दलाकडून शोधकार्य सुरू आहे.
Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले; 4 जवान हुतात्मा…
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत 4 जवान हुतात्मा…
काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी…
काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला; 10 जणांचा मृत्यू…
Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

