
कर्नाटकचे माजी डीजीपी आणि IPS ओम प्रकाश यांची हत्या; पत्नी ताब्यात…
मुंबई : कर्नाटकचे माजी पोलिस महासंचालक (डीजीपी) ओम प्रकाश यांची घरातच चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पत्नी पल्लवी हिच्यावर हत्येचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
आयपीएस ओम प्रकाश त्यांनी २०१५ ते २०१७ पर्यंत डीजीपी पद भूषवले. ते १९८१ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी होते. त्यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी आढळला. त्यांची पत्नी पल्लवी हिच्यावर हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या गंभीर गुन्ह्यामागील सत्य उलगडण्यासाठी प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
माजी डीजीपी ओम प्रकाश यांना दोन मुले आहेत. ते सध्या त्यांची पत्नी पल्लवीसोबत राहत होते. काही दिवसांपूर्वी पती-पत्नीमध्ये वाद झाल्याची माहिती पुढे आली आहे. दोघांमध्ये वैयक्तिक कारणांवरून वारंवार वाद होत असत. याच कारणामुळे पत्नीने हत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. ओम प्रकाश यांच्या घरात एक चाकू सापडला, जो जप्त करण्यात आला. त्यांच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ओम प्रकाश हे बिहारच्या चंपारण जिल्ह्यातील १९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी कर्नाटकात विजयनगर जिल्ह्यातील हरपनहल्ली येथे एएसपी म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्यांनी शिवमोग्गा, उत्तरा कन्नड आणि चिक्कमगालुरू जिल्ह्यांत पोलिस अधीक्षक म्हणून काम केले होते.
Ex IPS शिवदीप लांडे यांची नवी इनिंग सुरू…
मुंबई पोलिसातील IPS डॉ. सुधाकर पठारे यांचे तेलंगणात अपघाती निधन…
IPS अधिकाऱ्याचा पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना अपघाती मृत्यू…
महिला IPS अधिकाऱ्यावर पोलिसांनीच ठेवली ‘नजर’; सात पोलिस निलंबीत….
अभिनेत्री प्रकरण! तीन IPS अधिकाऱ्यांचे निलंबन…

