भामट्याने हळदी समारंभात जेवण केले अन् १४ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला…

मुंबई: नवी मुंबईच्या वाशी गावात एका फुकट्या पाहुण्याने हळदी समारंभात जेवण करून तब्बल १४ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता. पण, पोलिसांनी तपास करून अवघ्या तासाभरातच भामट्याला अटक केली. यामुळे चोरीला गेलेले 14 लाखांचे दागिने काही तासांतच मूळ मालकाला परत मिळाले आहेत.

परेश पवार (रा. ठाणे) हे आपल्या भाचीच्या हळदीसाठी वाशी गावात आले होते. समारंभादरम्यान आपले दागिने गाडीत सुरक्षित राहतील, म्हणून त्यांनी आपल्या फॉर्च्युनर कारमध्ये दागिने ठेवले. त्यानंतर ते हळदी कार्यक्रमाला उपस्थितीत राहिले. दरम्यान, फोनवर बोलत बोलत ते मंडपातून बाहेर गेले. मात्र त्यांच्या कारची चावी चुकून मंडपातील टेबलवर विसरली.

एका भामट्याने कारची चावी घेतली आणि कारमधील १३ लाख ९० हजारांचे दागिने गायब केले. परेश पवार यांनी आपली कार सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या समोर लावली होती. त्यामुळे हा चोरीचा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. हा प्रकार घडल्यानंतर परेश यांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता, कारमधून चोरी करणारा आरोपी एक कॅब चालक असल्याची माहिती मिळाली. चोरट्याचे नाव अंकुश सरगर असून तो नवी मुंबई परिसरात राहत असल्याचे पोलिसांना समजले. याच माहितीच्या आधारावर आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी शोध घेत केवळ साडेतीन-चार तासांत सरगर याला अटक केली.

दरम्यान, पोलिसांनी आरोपीकडील चोरी गेलेले सर्व दागिने हस्तगत करत मूळ मालकाला परत केले. परेश पवार यांनी पोलिसांचे आभार मानले. या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

एन्काऊंटरची ऑफर! दारुच्या नशेत माणूस खरं बोलतो : करुणा शर्मा

अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी…

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीची कारागृहात आत्महत्या…

नाशिक! सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची मन हेलावून टाकणारी चिठ्ठी…

पुणे! आईने 10 वर्षांनी झालेल्या दोन चिमुकल्यांना पाण्याच्या टाकीत बुडवून मारलं अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!