सोलापूर! मुलाचे गावातील महिलेसोबत प्रेमसंबंध; आईने केला विरोध अन्…

सोलापूर: प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या आईची मुलाने हत्या केल्याची धक्कादायक घटना सिन्नूर (ता. अक्कलकोट) येथे घडली आहे. भिमाबाई हनुमंत कळसकोंडा असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात रमेश कळसकोंडा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने शेतात आईचा साडीने गळा आवळून खून केला आहे. या प्रकरणी आरोपीसह त्याच्या प्रेयसीविरोधात अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

आरोपी रमेश कळसकोंडा याचे गावातील एका महिलेसोबत प्रेम संबंध सुरू होते. याची माहिती भीमाबाई यांना मिळाल्यानंतर त्यांनी रमेशच्या प्रेम प्रकरणाला विरोध केला. संबंधित महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवू नयेत, असा सल्ला आईने दिला पण मुलगा काही केल्या ऐकायला तयार नव्हता. यामधून रमेश आणि आई भीमाबाई यांच्यात सासत्याने वाद होऊ लागले. याच वादातून आरोपी रमेश याने आईची हत्या करण्याचा कट रचला. यासाठी त्या गावातील प्रेयसीची मदत घेतली. तिच्याशी संगनमत करत आरोपी रमेश याने शेतात आईचा साडीने गळा आवळून खून केला.

या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात रमेश आणि त्याच्या प्रेयसी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. पण एका महिलेच्या नादात युवकाने आपल्या वयोवृद्ध आईचा जीव घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नाशिक! सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची मन हेलावून टाकणारी चिठ्ठी…

दोन्ही मृतदेहांची ओळख पटली; प्रेमप्रकरणातून हत्या; चौघांना अटक…

नागपूर दुहेरी हत्याकांडाने हादरलं; घरातील रॉडने हल्ला…

पुणे! आईने 10 वर्षांनी झालेल्या दोन चिमुकल्यांना पाण्याच्या टाकीत बुडवून मारलं अन्…

पुणे शहरात मैत्रिणीने कोल्ड कॉफीमध्ये गुंगीचे औषध मिसळून केला विश्वासघात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!