
Video: नवरा कामासाठी घराबाहेर अन् पत्नीने बालावले घरी; पकडले रंगेहाथ…
लखनौ (उत्तर प्रदेश): नवरा कामासाठी बाहेर गेल्याचे लक्षात येताच त्याच्या पत्नीने नगरसेवक मित्र आणि त्याच्या अन्य एका मित्राला मध्यरात्रीच्या सुमारास घरी भेटण्यासाठी बोलावले. पत्नीवर लक्ष ठेवलेल्या पतीने तत्काळ पोलिसांची मदत मागितली. पोलिस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा तिघेही रंगेहाथ सापडले. नागरिकांनी या संपूर्ण दृश्याचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे.
मौरानीपूर येथील एक रहिवासी महोबा जिल्ह्यातील आरोग्य विभागात काम करत असून, त्याची पत्नी सरकारी शाळेत लिपिक आहे. लिपिक पत्नी अनेक दिवसांपासून नगरसेवकाच्या संपर्कात असल्याचे नवऱ्याला समजले होते. या प्रकरणावरून पती-पत्नीमध्ये वाद होत होते. नवरा 8 एप्रिलच्या रात्री महोबा येथे ड्युटीवर गेला होता. त्यानंतर एका ओळखीच्या व्यक्तीने त्याला सांगितले की, त्याच्या घरी दोन व्यक्ती आले आहेत. माहितीची खात्री केल्यानंतर, त्या व्यक्तीने पोलिसांना फोन केला. रात्री उशिरा त्या पुरूषाच्या फोनवरून पोलिस घटनास्थळी पोहोचल्याचे पाहून महिलेच्या घराबाहेर गर्दी जमली. पोलिसांनी नगरसेवक आणि त्याच्या मित्राला घराबाहेर काढले. यावेळी नागरिकांनी व्हिडिओ बनवले आणि व्हायरल केले आहेत.
पोलिसांना स्पष्टीकरण देताना महिलेने सांगितले की, तिला पोटात दुखत होते. दोघे ओळखीचे असल्याने त्यांना मदतीसाठी बोलावले होते. दुसरीकडे, महिलेच्या पतीने एक व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने आरोप केला आहे की, पत्नी आणि त्याचा नगरसेवक मित्र त्याला जीवे मारण्याची आणि त्याचा मृतदेह ड्रममध्ये फेकण्याची धमकी देत आहेत. मौरानीपूरचे सीओ रामवीर सिंह म्हणाले की, ‘पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी अद्याप कोणतीही लेखी तक्रार आलेली नाही.’
👉🏾 साम को ड्यूटी से आये व्यक्ति को लगा कि उसकी पत्नी के साथ कोई कमरे में है,
👉🏾 दरबाजे में कान लगाकर सुना तो शक यकीन में बदल गया, पति पत्नी के प्रेमी से अंकेले मुकाबला करने की हिम्मत नहीं जुटा पाया। तो 112 पुलिस को बुलाया।
👉🏾 112 पुलिस आई औऱ दरबाजा खटखटाई, अंदर से… pic.twitter.com/6iZrCnXNmt
— Abhimanyu Singh Journalist (@Abhimanyu1305) April 10, 2025
पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली पती जेलमध्ये तर पत्नीला प्रियकरासोबत हॉटेलमध्ये पकडले रंगेहाथ…
प्रियकरासोबत दोघांना रंगेहाथ पकडल्याची घटना सीसीटीव्हीत कैद…
Video: पोलिसाने पकडले पत्नीला युवकासोबत रंगेहाथ अन्…
सासरा आणि सुनेला रंगेहात पकडले अन् दुसऱ्याच दिवशी नको ते घडलं…
धक्कादायक! पत्नीला पाच युवकांसोबत रंगेहाथ पकडले अन् पडला रक्ताचा सडा…
पोलिस अधिकाऱ्याला वहिनीसोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडले अन्…

