एक कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी आरोपींना अटक पुर्व जामीन मंजूर…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी): एक कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी हर्षिता कंन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक एस. एम. श्रीनिवास रेड्डी यांचे मार्फत व्यवस्थापक चीट्टी कालिदास राजाराव (वय ३४) यांनी दाखल केलेल्या लेखी तक्रारीवरुन फरहान ट्रेडर्सचे संचालक तथा सैय्यद फिरोज (रा. कुर्ली ता. घाटंजी) यांची पत्नी निलोफर सैयद फिरोज (वय ५८, रा. कुर्ली ता. घाटंजी ह. मु. भोसा रोड, यवतमाळ), राॅयस एटंरप्राईजेसचे संचालक तथा सैय्यद फिरोज यांचा मुलगा सैय्यद फरहान सैय्यद फिरोज (वय ३०, रा. कुर्ली ता. घाटंजी ह. मु. भोसा रोड, यवतमाळ) यांचे विरुद्ध अवधुतवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (५), ३१८ (३) (४), ३ (५) अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

आरोपीने ॲड. उमेशकुमार बिसेन यांच्या मार्फत फौजदारी जामीन अर्ज क्रंमाक ९४/२०२५ विशेष न्यायाधीश तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. साळगांवकर यांच्या न्यायालयात दाखल केला होता. सदर जामीन अर्जावर युक्तीवाद होउन आरोपी सैय्यद फिरोज (रा. कुर्ली) यांची पत्नी निलोफर सैयद फिरोज, मुलगा सैय्यद फरहान सैय्यद फिरोज यांचा अटकपूर्व जामीन अर्ज यवतमाळचे विशेष न्यायाधीश तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. साळगांवकर यांनी १५,००० रुपयाच्या जात मुचलक्यावर मंजूर केला आहे. आरोपी निलोफरतर्फे ॲड. उमेशकुमार बिसेन यांनी न्यायालयात युक्तीवाद केला. हर्षिता कंन्स्ट्रक्शन कंपनीकडून अर्जदार एस. एम. श्रीनिवास रेड्डी यांचे मार्फत सरकारी वकीलांना न्यायालयात सहकार्य करण्यासाठी ॲड. इम्रान देशमुख हे असीस्ट टु प्रोस्युकेशन म्हणून उपस्थित होते.

हर्षिता कंन्स्ट्रक्शन कंपनीचे यवतमाळ येथे कार्यालय असून वर्धा – यवतमाळ – नांदेड रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. कळंब ते यवतमाळ रेल्वे स्टेशनपर्यतंच्या पुलाचे बांधकाम करण्याचे कंत्राट आंध्रप्रदेश येथील हर्षिता कंन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. पुलाचे बांधकाम करण्यासाठी सिमेंट व इतर साहित्याचा पुरवठा करण्याकरीता भोसा (यवतमाळ) येथील फरहान ट्रेडर्सच्या संचालक निलोफर सैयद फिरोज (मु. पो. कुर्ली ता. घाटंजी ह. मु. भोसा रोड, यवतमाळ), राॅयस एटंरप्राईजेसचे संचालक सैय्यद फरहान सैय्यद फिरोज (मु. पो. कुर्ली ता. घाटंजी ह. मु. भोसा रोड, यवतमाळ) यांच्या सोबत तोंडी करार केल्यानुसार हर्षिता कंन्स्ट्रक्शन कंपनीने निलोफर सैय्यद फिरोज व सैय्यद फरहान सैय्यद फिरोज या पुरवठादारांना वेळो वेळी RTGS करुन ९९ लाख ९९ हजार ९९८ रुपये दिले होते. परंतु, एक वर्षाचा कालावधी लोटुनही सिमेंट व इतर बांधकाम साहित्याचा पुरवठा केला नाही. त्यावरुन आरोपी निलोफर सैय्यद फिरोज, सैय्यद फरहान सैय्यद फिरोज यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्या नंतर व्यवस्थापकाने अवधुतवाडी पोलीस ठाण्यात दोघां विरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली. त्यामुळे अवधुतवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी आई निलोफर सैयद फिरोज, मुलगा सैय्यद फरहान सैय्यद फिरोज यांना विशेष न्यायाधीश आर. एस. साळगांवकर यांनी १५,००० रुपयाच्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, विशेष न्यायाधीश तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींना काही अटीवर पोलीस ठाण्यात हजेरी देणे, तपासात सहकार्य करणे या सह तात्पूरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन…

घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन सदस्य अपात्र प्रकरणात उच्च न्यायालयात सुनावणी…

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाचा मोठा दिलासा…

कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाने दिले आदेश…

न्यायाधीश व अधिवक्त्यांनी अधिकाधिक मराठीचा वापर करावा: नागेश न्हावकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!