
पुणे! भारती विद्यापीठ पोलिसांच्या कामगिरीचे नागरिकांनी केले कौतुक!
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलिसांनी अकरा गुन्हयातील जप्त केलेले १५ लाख रुपयांचे २०० ग्रॅम (२० तोळे ) वजनाचे सोन्याचे दागिने नागरीकांना परत केले आहेत. नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करत आभार मानले आहेत.
भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे जबरी चोरी, घरफोडी चोरी व इतर चोरीचे एकुण ११ गुन्हयातील विविध स्वरुपाचे सोन्याचे दागिने आरोपींकडून १५ लाख रुपयांचे २०० ग्रॅम (२० तोळे) वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते. सदरचे दागिने हे १७/०३/२०२५ रोजी सहा. पोलिस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे राहुल आवारे व वरीष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर यांचे हस्ते नमुद गुन्हयातील ११ फिर्यादी यांना परत करण्यात आले आहे. सदर कामगिरीमुळे नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, मा. पोलिस उप आयुक्त परिमंडळ २, स्मार्तना पाटील, पोलिस उप आयुक्त, पुणे शहर विशेष शाखा पुणे मिलिंद मोहीते, सहा. पोलिस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, पोलिस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलिस अंमलदार उमाकांत ढोले, यास्मीन मणेर, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, सागर बोरगे, बंडु सुतार यांनी केली आहे.
पुणे! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मित्रांनी केला मोठा घात; धक्कादायक माहिती समोर…
पुणे पोलिसांनी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झालेबाबतचा खोटा बनाव केला उघड…
पुणे! आयुवेर्दिक उपचार केंद्रामध्ये टॉप काढण्यास सांगून धमकावणारे अटकेत…
पुणे पोलिसांनी गौरव अहुजा याच्यासह मित्राचा उतरवला माज; लघवी केली तिथेच…
पुणे! कोंढवा पोलिसांनी ४३,०४,०६० रूपये फिर्यादीस दिले परत मिळवून…

