नागपूर शहरातील अनेक भागांमध्ये संचारबंदी; 80 जणांना अटक…

नागपूर: नागपूरमध्ये सोमवारी (ता. १७) दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर आज परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. महाल भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले आणि 80 जणांना अटक केली आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ आणि मजकूर पसरवणारी 55 सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारवर आहेत. कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा,नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री हिंसा उसळल्यानंतर वीज आणि इंटरनेट बंद करण्यात आले होते. त्यानंतर दोन गटांकडून एकमेकांवर आणि पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली होती. सध्या नागपूरमध्ये संचारबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले असून, महाल परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त आहे. शिवाय, सोमवारी रात्रभर पोलिसांचे अटकसत्र सुरु होते. याशिवाय, सायबर पोलिसांकडून जवळपास 1800 सोशल मिडिया अकाऊंटस तपासण्यात आली आहेत. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर आणि 55 व्हिडीओ पोलिसांच्या रडारवर आहेत. नागपूरच्या महाल परिसरानंतर हंसपुरी भागातही तणाव निर्माण झाल्याची माहिती आहे. या भागात 20 ते 22 वाहनांची तोडफोड करण्यात आली. मात्र, पोलिसांनी येथील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली आहे.

पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या एका पत्रकानुसार, सोमवारी नागपूरमधील गणेशपेठ आणि महाल परिसरात सकाळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्याकडून औरंगजेबाची कबर हटवण्याच्या अनुषंगाने आंदोलन करण्यात आले. त्यावेळी औरंगजेबाचा फोटो आणि त्यामध्ये हिरव्या रंगाच्या कापडातील (गवताचा पेंडा भरुन) प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली. संध्याकाळी 7.30 वाजता गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भालदारपुरा येथे 80 ते 100 लोकांनी जमून पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. एका पोलिस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. यामध्ये त्याचा हात जायबंदी झाली आहे.

नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर ढाबा मालकाला बंदुकीच्या धाकावर लुटले…

नागपूरमध्ये ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या एसयूव्ही कारवर हल्ला…

अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसकाकाचा अपघाती मृत्यू…

नागपूर हादरलं! प्रियकर विवाहित तर प्रेयसी अनविवाहित अखेर…

नागपूरमध्ये स्वातंत्र्यदिनी पोलिस स्टेशनमध्ये डान्स करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!