पुणे शहरातील मार्केटयार्ड पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपीच्या आवळल्या मुसक्या…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील मार्केटयार्ड पोलिस स्टेशन कडील रेकॉर्डवरील आरोपी हा अंमली पदार्थाची विक्री करताना मिळून आल्याने पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मार्केटयार्ड पोलिस ठाणे कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार अतिक करीम बागवान (वय-२७ वर्षे, व्यवसाय- मजुरी, रा- स.नं. ५७०, गल्ली नं. ०६, आंबेडकरनगर, मार्केटयार्ड पुणे) याने आंबेडकरनगर परीसरात एम.डी. (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी स्वतःचे ताब्यात मिळून आल्याने त्यास मार्केटयार्ड पोलिस स्टेशन येथे अटक केली आहे. त्याबाबत सविस्तर माहिती अशी की, मार्केटयार्ड पो.स्टे च्या हाद्दीत वरिष्ठांच्या आदेशान्वये मार्केटयार्ड पोलिस ठाणेचे कार्यक्षेत्रातील रेकॉर्डवरील आरोपी, पाहिजे आरोपी, चेक करणेकामी वपोनि यांचे दिमतीत तपास पथकातील पोउपनि सावन आवारे, व सपोनि मोरे, पोउपनि भापकर, पोहवा ७५५४ जाधव, पोअं १०४६४ झायटे, पोअं २३९२ यादव, यांचेसह रात्री ०१.३० वा खाजगी वाहनाने मार्केटयार्ड पो.स्टे च्या हाद्दीत रवाना झालो.

बैलबाजार येथे पेट्रोलींग करीत असताना पो हवा ७५५४ किरण जाधव यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपीआतिक करीम बागवान हा गल्ली नं. १४, आंबेडकरनगर, सार्वजनिक शौचालय भिंतीचे आड बाजूस उभा असले बाबत माहिती मिळाली असता त्यांनी सदरची बातमी ही सपोनि मोरे साहेब यांना कळविले असता, त्यांनी सदरची बातमी ही वपोनि मार्केटयार्ड पो.स्टे. यांना कळविली असता त्यांनी खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. ०९/०३/२०२५ रोजी ०२.३० वा चे सुमारास आतिक करीम बागवान हा संशयास्पदरित्या उभा दिसला. पोलिसांना पाहुन तो पळून जात असताना त्याला थोडयाच अंतरावर पकडले.

सपोनि मोरे यांनी विचारपुस करता, तो सदर ठिकाणी एम.डी. हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी थांबल्याचे सांगीतले. आतिक बागवान याची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे जवळ ६ग्रॅम ३०० मिली ग्रॅम एम.डी. (मॅफेड्रॉन) एकुण १,०९,०००/- रुपये किंमतीचा अंमली पदार्थ मिळुन आल्याने मार्केटयार्ड पोलिस स्टेशन गु.र.नं. ४१/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २१(ब) गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सपोनि मोरे करीत आहेत.

सदरची कारवाई अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, सह पोलिस आयुक्त, पुणे शहर, मनोज पाटील, अप्पर पोलिस आयुक्त, पुणे शहर, श्री राजकुमार शिंदे, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर, धन्यकुमार गोडसे, सहा पोलिस आयुक्त वानवडी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनिषा पाटील यांचे आदेशाने तपास पथकाचे पोउपनि सावन आवारे, सोबत सपोनि चेतन मोरे, पोउपनि भापकर, पोहवा ७५५४ जाधव, पोअं १०४६४ झायटे, पोअं २३९२ यादव यांनी केली आहे.

पुणे पोलिसांनी गौरव अहुजा याच्यासह मित्राचा उतरवला माज; लघवी केली तिथेच…

स्वारगेट बस स्टॅण्ड येथे लॅपटॉप चोरी करणारा स्वारगेट पोलिसांकडून जेरबंद…

पुणे! कोंढवा पोलिसांनी ४३,०४,०६० रूपये फिर्यादीस दिले परत मिळवून…

पुणे जिल्हा हादरला! युवतीवर सामूहिक बलात्कार करून केले Video शुटिंग….

पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार; अंधारात ताई-ताई बोलला…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!