पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडे याच्या मैत्रिणीला बोलावलं अन् माहिती आली समोर…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट एसटी आगारातील एसटी बसमध्ये एका युवतीवर (वय २६) बलात्कार करणाऱ्या दत्तात्रय गाडे याचा पुणे पोलिसांकडून सध्या कसून शोध घेतला जात आहे. पुणे पोलिसांच्या तपास पथकांची संख्या 13 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडे याच्या मैत्रिणीला बोलावले आणि धक्कादायक माहिती पुढे आली.

दत्तात्रय गाडे याच्या मित्र-मैत्रिणींची गुन्हे शाखेने बुधवारी चौकशी केली. गाडे याच्या एका मैत्रिणीला भोरवरुन चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आले. त्यावेळी तिने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली. दत्तात्रय गाडे मला सारखे फोन करायचा आणि मेसेज करायचा. या दोघांची आणखी एक मैत्रीण होती. तिच्याशी पॅचअप करुन दे किंवा तिची भेट घालून दे, असे तगादा दत्तात्रय गाडे माझ्याकडे लावत होता. तो यासाठी मला सतत फोन करुन त्रास द्यायचा, असे या गाडेच्या मैत्रिणीने सांगितले. त्यामुळे दत्तात्रय गाडेने महिलेवर अत्याचार केल्याची ही पहिलीच घटना नसावी, यापूर्वीही त्याने महिलांना त्रास दिला असावा, असा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी रात्रीपर्यंत दत्तात्रय गाडे याच्या 10 मित्र-मैत्रिणींची चौकशी केली. या सगळ्यांकडून दत्तात्रय गाडे याच्याबद्दल खडानखडा माहिती पोलिसांनी काढून घेतली आहे. दत्तात्रय गाडे हा मूळचा शिरुर तालुक्यातील रहिवासी आहे. पोलिसांनी शिरुरमधील त्याच्या घरी बंदोबस्त लावला आहे. याशिवाय, दत्तात्रय गाडे याच्या आई-वडिलांना आणि भावाला पोलिसांनी चौकशीसाठी पुण्यात बोलावून घेतले आहे.

दरम्यान, दत्तात्रय गाडे याने मंगळवारी (ता. २५) पहाटे स्वारगेट डेपोच्या आवारात उभ्या असणाऱ्या युवतीला फसवून एका शिवशाही बसमध्ये नेले होते. युवती बसमध्ये चढल्यानंतर दत्तात्रय गाडे याने दार बंद करुन घेतले आणि तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला. ससून रुग्णालयाने पुणे पोलिसांना सुपूर्द केलेल्या युवतीच्या वैद्यकीय तपासणी अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. पीडित युवती ही पुण्यात परिचारिका म्हणून काम करत होती. ती मंगळवारी फलटणमधील आपल्या गावी जाण्यासाठी निघाली होती. युवतीवर झालेल्या अत्याचारामुळे राज्यभरात संतप्त पडसाद उमटत आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

स्वारगेटच्या बसस्थानकात कंडोम, चादरी अन् दारुच्या बाटल्या…

पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार; अंधारात ताई-ताई बोलला…

पुणे हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला युवतीवर सामूहिक बलात्कार…

पुणे शहरात 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने केला बलात्कार…

पुणे शहरात कंपनीत एचआर पदावर काम करणाऱ्या युवतीवर बलात्कार…

धक्कादायक! पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविकेवर बलात्कार…

संतापजनक! महिलेवर अमानुषपणे बलात्कार अन् शरीरात ठोकले खिळे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!