
महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी केला सामूहिक अत्याचार…
वर्धा : एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
वर्धा जिल्ह्यातील आर्वी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलीचा मित्र तिला 10 फेब्रुवारी रोजी सकाळी आपल्या घरी घेऊन गेला होता. घरी गेल्यानंतर त्याने पीडितेवर जबरदस्ती करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर आरोपीचे चार मित्र घरी आले. त्यांनी अल्पवयीन मुलाला घराबाहेर पाठवून अत्याचार केला. अत्याचारानंतर मित्र पीडित मुलीला घरी सोडून आला. या घटनेनंतर रात्री पीडित मुलीची आई कामावरून घरी आली असता, पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला. यानंतर आईने तातडीने आर्वी पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पाचही आरोपींवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पाचही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
आर्वी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश डेहाणकर यांनी सांगितले की, गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्वी पोलिसांचे पथक आरोपींच्या शोधासाठी तत्काळ रवाना झाले होते. पोलिसांनी पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यातला एक आरोपी अल्पवयीन आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पीडित मुलीचा जबाब नोंदवून घेतला आहे. या घटनेचा अधिक तपास आर्वी पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक सुचिता मांडवले आणि गणेश खेडकर करत आहेत.
गोव्यात युवतीवर पाच जणांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार…
धक्कादायक! मूल होत नसल्याने भोंदूबाबासह दिराने केला सामूहिक बलात्कार…
धक्कादायक! नवऱ्यासमोर महिलेवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार…
पुणे हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला युवतीवर सामूहिक बलात्कार…
संतापनजक! प्रेमविवाहानंतर मित्रांना बोलवून पत्नीवर सामूहिक बलात्कार अन्…

