व्हॅलेंटाईन डेलाच प्रेयसीवरील संशयातून मित्राची हत्या…

नागपूर : ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशीच प्रेयसीवरील संशयातून एकाची भर दिवसा हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरज उर्फ ​​बिहारी महतो (बालाजी नगर) असे मृत युवकाचे नाव आहे. तर बिपीनकुमार गुप्ता (वय 25, नाईक नगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. अजनी पोलिस पुढील तपास करत आहेत. भरदिवसा झालेल्या या घटनेने पुन्हा एकदा नागपूर शहर हादरले असून […]

अधिक वाचा...

थरार! समृद्धी महामार्गावरून पोलिसांनी संशयास्पद ट्रकचा पाठलाग सुरू केला अन्…

नागपूर : समृद्धी महामार्गावर एक ट्रक संशयास्पद अवस्थेत प्रवास करत असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडल्यानंतर 50 पेक्षा जास्त गाई आढळल्या आहेत. ट्रकचालकासह दोन जण ट्रक सोडून पसार झाले. पोलिसांनी अज्ञात गो तस्करांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. समृद्धी महामार्गावरील वर्धा जिल्ह्यातून जाणाऱ्या भागात एक ट्रक रविवारी (ता. २८) दुपारी साडे […]

अधिक वाचा...

सुनील केदार यांचे जंगी स्वागत करणाऱ्या 100 जणांवर गुन्हा दाखल…

नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणी शिक्षा झालेल्या सुनील केदार यांची बुधवारी (ता. १०) जामिनावर सुटका झाली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत कार्यकर्त्यांनी केले. या प्रकरणी नागपूरमधील धंतोली पोलीस स्टेशनमध्ये १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. सुनील केदार यांची सुटका झाल्यानंतर रॅली काढू नये, असे पोलिसांनी सांगितले […]

अधिक वाचा...

महिलेचा पाठलाग, शिवीगाळ करणे आणि ढकलणे हा विनयभंग नाही…

नागपूर : महिलेचा पाठलाग करणे, तिला शिवीगाळ करणे आणि सायकल चालवताना ढकलणे हा विनयभंगाचा गुन्हा ठरत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विनयभंगाच्या एका प्रकरणात निकाल देताना निरीक्षण नोंदवले आहे. वर्धा येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने एका युवकाविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. सायकल वरून जाताना एका युवकाने पाठलाग केला, शिवीगाळ केली आणि ढकलले असल्याचे […]

अधिक वाचा...

ट्रक आणि कारचा भीषण अपघात 6 ठार; पाहा नावे…

नागपूर : नागपूरमध्ये ट्रक आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच गावातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून, स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रक आणि कारचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे लग्न समारंभ आटोपून आपल्या गावी परतत असताना हा […]

अधिक वाचा...

आयएएस-आयपीएस अधिकारी न झाल्याची खंत; निरीक्षकाची आत्महत्या…

नागपूर: अन्न व औषधी प्रशासन विभागातील एका निरीक्षकाने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. भम सिद्धार्थ कांबळे (वय 25, वर्मानगर, गंगाखेड, परभणी) असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. नागपूर शहरातील गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. आयएएस-आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ न शकल्याने अन्न व औषधी प्रशासन विभागातील निरीक्षक […]

अधिक वाचा...

नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्याची निर्घृण हत्या; आरोपींचा अपघात अन् पुढे…

नागपूर : उमरेड तालुक्यातील सुरगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि भाजप उमरेडचे तालुका महामंत्री राजू भाऊराव ढेंगरे (४८, रा. दिघोरी, नागपूर) यांची शुक्रवारी (ता. १०) मध्यरात्री निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. नागपूर-उमरेड महामार्गावर कुही फाट्यालगत त्यांचा ढाबा आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर २:३० वाजताच्या सुमारास राजू ढेंगरे गाढ झोपेत असतानाच ढाब्यावर काम करणाऱ्या […]

अधिक वाचा...

दोन भावांचा एकाच महिलेवर जडले प्रेम अन् पुढे…

नागपूर : दोन चुलत भावांचे एक महिलेवर असलेल्या प्रेमामुळे एकाला जीव गमवावा लागला आहे. आरोपी राजेश चौहान उर्फ गब्बरच्या (वय ४७) लिव्ह इन पार्टनरने लग्न न करता त्याच्या मुलांना जन्म दिला होता; पण नंतर या महिलेचा (वय ३५) गब्बरच्या चुलत भावावर जीव जडला आणि खुनाची घटना घडली. महिलेचा लिव्ह-इन-पार्टनर असलेल्या गब्बरने आपला चुलत भाऊ नितीन […]

अधिक वाचा...

Video: गृहमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिस उपायुक्तांना धक्काबुक्की…

नागपूर : पोलिस उपायुक्त राहुल मदने यांना भाजपच्या युवा शहर प्रमुखाकडून धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली आहे. धक्काबुक्कीचा व्हिडीओ खासदार संजय राऊत यांच्याकडून ट्विट केला आहे. नागपूरचे पोलिस उपायुक्त राहुल मदने यांना भाजपचे युवा शहराध्यक्ष पुष्कर पोशेट्टीव यांनी धक्काबुक्की केली. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. उपायुक्त पदाच्या पोलिस अधिकाऱ्याला अशाप्रकारे धक्काबुक्की कशी केली […]

अधिक वाचा...

प्रेम आणि धमकी! FB लाइव्ह करत युवकाने मारली नदीत उडी अन्…

नागपूर : पाच लाख रुपयांची खंडणी न दिल्यास बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकीच्या त्रासाला कंटाळून युवकाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नदीत उडी मारण्यापूर्वी युवकाने फेसबुक लाइव्ह करत आपल्यावर करण्यात येत असलेले आरोप खोटे असून महिलेसह तिचे कुटुंबीय त्रास देत असल्याचे म्हटले आहे. मनीष रामपाल यादव असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मनीष […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!