
पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
प्रसिद्ध उद्योजक आणि पुणे शहरातील प्रसिद्ध श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सवप्रमुख पुनीत बालन हे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात मोठे काम करत आहेत. पोलिस दल आणि विशेषतः जम्मू-काश्मीरमध्ये लष्करासाठी त्यांचे मोठे काम आहे. काश्मीरमधील बारामुल्ला, उरी, अनंतनाग, सोफिया, पेहलगाम अशा अनेक भागात त्यांनी शाळा उभारल्या आहेत. सामाजिक काम करत असताना समाजापुढे त्यांनी एक आदर्श ठेवला आहे. त्यांच्याविषयी थोडक्यात…
पुनीत बालन यांचे शिक्षण पुणे शहरातील विखे-पाटील हायस्कूलमध्ये, तर मराठवाडा मित्रमंडळ कॉलेजमधून बी.कॉम.ची पदवी घेतली आहे. दोन वर्षे त्यांनी नोकरी केली असून, वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी व्यवसायात प्रवेश केला आहे. वडिलांचा व्यवसाय तर आई शिक्षिका होती. आजोबा कर्नल होते. आजोबा लष्करात असल्याने त्यांची लष्करात जाण्याची इच्छा होती. पण, व्यवसायाकडे वळले. व्यवसाय करत असतानाही देशसेवेचे व्रत सोडले नाही. विविध माध्यमातून देशासाठी काम करत असून, लष्कराच्या पाच कमांडसाठी ते काम करत आहेत. ‘भारतीय सैन्य दलासाठी मला काम करण्याची संधी मिळते हे मी माझे भाग्यच समजतो. सैन्य दलासमवेत नवीन कश्मीर घडविण्यासाठी जे काही करावे लागेल, ते निश्चितपणे मी करेल. हे काम करताना सैन्य दलाकडून मिळालेले प्रशस्तिपत्रक निश्चितपणे माझे मनोबल वाढविणारे आहे,’ असे इंद्राणी बालन फाउंडेशन व पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालत सांगतात.
काश्मीर खोऱ्यात शिक्षणाचा वसा…
भारतीय लष्कराच्या साह्याने ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’ने काश्मीर खोऱ्यातील संवेदनशील भागात शाळा सुरू केली आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दल पुनीत बालन सांगतात, ‘‘काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्कराकडून गेल्या अनेक वर्षांपासून ‘आर्मी सद्भावना मिशन’अंतर्गत आर्मी गुडविल स्कूल या नावाने काही शाळा चालविल्या जातात. काश्मीर खोऱ्यात योग्य प्रकारचे शिक्षण दिले जावे, तेथील विद्यार्थी वाममार्गाला लागू नयेत, असा लष्कराचा हेतू आहे. या उपक्रमासाठी ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’ने भारतीय लष्कराशी करार केला असून, शाळांच्या माध्यमातून काश्मीर खोऱ्यात सर्वांगीण विकास करणारे शिक्षण पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. या उपक्रमासाठी ‘१५ चिनार कोअर’ या तुकडीचे सहकार्य लाभले आहे. सर्वाधिक दहशतवादी कारवाया होणाऱ्या थंगधर, उरी, बारामुल्ला, कुपवाडा, अनंतनाग, पुलवामा, शोपियान, पहलगाम, त्रेगाम इत्यादी भागांत या शाळा चालविल्या जातात. उरीतील शाळेत आज ५५०० विद्यार्थी शिकत असल्याचा आपल्याला अभिमान आहे.’’
काश्मीरमध्ये १३ शाळा चालवतात…
पुनीत बालन हे ग्रुपच्या माध्यमातून २०१८ मध्ये ३७० कलम झाल्याच्या अगोदरपासून जम्मू-काश्मीरमध्ये काम करत आहेत. ते सांगतात, ‘लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू कोअर कमांडर होते. त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही माझ्याशी संपर्क साधला. ज्यांच्या आई-वडिलांना दहशतवाद्यांनी मारले आहे, त्यांच्या मुलींसाठी त्यांची एक शाळा होती. त्या मुली अनाथ होत्या. त्यांना सांभाळण्याचे काम एक संस्था करत होती. त्यांना आम्ही निधी दिला. लष्कराचे प्राथमिक काम शाळा चालवणे हे नाही तर आपल्या सीमांचे संरक्षण आहे. सद्भावना मिशनमध्ये त्यांना या गोष्टी करायच्या होत्या. काश्मीरमध्ये आज आम्ही १३ शाळा चालवत आहोत, हे मी आनंदाने सांगतो. सगळ्या शाळा दहशतग्रस्त भागांमध्ये आहेत. त्या पण केवळ संयुक्तपणे चालवत नाही तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी निधीची व्यवस्था केली आहे. या शाळांमधील सर्व शिक्षण मोफत केले आहे. २०१९ पासून आत्तापर्यंत पाच वर्षे हे सहकार्य सुरू आहे. हे करत असताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. पण, आनंदाची गोष्ट अशी की या १३ शाळांमधील बारामुल्ला आणि कुपवाडा येथील दोन शाळा विशेष मुलांच्या आहेत.’’
आईची जपली आठवण…
जम्मू-काश्मीरमध्ये विशेष मुले महत्त्वाची आहेत. कारण, दहशतवाद्यांची ती सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यांचा दहशतवादी कृत्यांसाठी वापर होऊ शकतो. बाकीच्या शाळांमध्ये पाच हजार मुली आहेत. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढते आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहावीच्या निकालात पाचव्या क्रमांकावर आपल्या शाळेची मुलगी होती. बारामुल्ला जिल्ह्यात पहिल्या पाचमध्ये आपल्या शाळेच्या मुले-मुली होत्या. ‘इंद्राणी बालन आर्मी गुडविल’ नावाने या शाळा सुरू आहेत. यामधून आईची आठवण जपली आहे. आईने २००७ मध्ये माझ्याकडून एक वचन घेतले होते. तेव्हापासून सामाजिक कार्य सुरू केले आहे. आईने सांगितले की, तू एक रुपया कमावलास तर ३० टक्के सरकारला दे, ३० टक्के सामाजिक कार्यासाठी दे आणि चाळीस टक्के स्वतःसाठी ठेवून चांगले आयुष्य जग. जे उरेल ते परत समाजासाठी दे. आजही फाउंडेशनमार्फत जे कार्य होते ते या तीस टक्क्यांतून होते, असे पुनीत बालन सांगतात.
भारतीय सैन्य दलाकडून प्रशंसा…
पुनीत बालन ग्रुप आणि इंद्राणी बालन फाउंडेशनच्या माध्यमातून पुनीत बालन हे देशभर सामाजिक काम करीत आहेत. काश्मीर खोऱ्यामध्ये भारतीय सैन्य दलासमवेत शिक्षणासह विविध विकासकामांत महत्त्वाचे योगदान देत असल्याबद्दल युवा उद्योजक पुनीत बालन यांना भारतीय सैन्य दलाकडून प्रशंसा प्रशस्तिपत्रक देण्यात आले आहे. सैन्य दलाचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांच्या हस्ते हे प्रशस्तिपत्रक देण्यात आले. काश्मीर खोऱ्यातील अनेक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटविण्यासाठी पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात येते, यांत आफरीन हैदर (तायक्वांदो), सायकलपट्टू मोहोम्मद सलीम, उमर सय्यद (खो-खो) अश्या अनेक खेळाडूंचा समावेश आहे. तसेच प्रजासत्ताक दिनी अतिरेक्यांचा सर्वांत जास्त धोका असलेल्या शोपियान मध्ये सर्वांत 150 फूट उंचीचा तिरंगा ध्वजही उभारला आहे. काश्मीर खोऱ्याच्या समृद्धीसाठी आणि विकासासाठी त्यांच्या या भरीव कामगिरीची दखल घेऊन दिल्ली येथे भारतीय सैन्य दलाकडून उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांनी बालन यांना प्रशंसा प्रशस्तिपत्रक देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.
माझे भाग्यच समजतो…
‘देशाच्या सुरक्षिततेसाठी सिक्रेट सर्व्हिस अॅक्टवर सही केली आहे. त्यामध्ये काही अटी असतात. ज्या पातळीवरील काम आम्ही करतो ती माहिती माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरू शकत नाही. अनेक लोक राजकारणात आल्यावर ही माहिती वापरतात. माझ्यासाठी देशसेवा सर्वांत मोठी आहे, मी त्यामध्येच खूष असून, मी तेच करत राहणार आहे. भारतीय सैन्य दलासाठी मला काम करण्याची संधी मिळते हे मी माझे भाग्यच समजतो. सैन्य दलासमवेत नवीन काश्मीर घडविण्यासाठी जे काही करावे लागेल, ते निश्चितपणे मी करीन. हे काम करताना सैन्य दलाकडून मिळालेले प्रशस्तिपत्रक निश्चितपणे माझे मनोबल वाढविणारे आहे, असेही पुनीत बालन सांगतात.
पोलिसकाकांना किटचे वाटप…
आषाढी वारीसाठी पंढरपूर शहरात वारकऱ्यांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी असणाऱ्या पोलिस बांधवांना ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ५ हजार किट देण्यात आली आहेत. या किटमध्ये दैनंदिन वापराच्या आवश्यक असलेल्या वस्तूंचा समावेश असल्यामुळे पोलिस बांधवांची गैरसोय टळण्यास मदत होत आहे. लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस अधिकारी, पोलिस अंमलदार, होमगार्ड, आरपीसी पथक, क्यूआरटी पथक असा एकूण ८ हजार अधिकारी आणि कर्मचारी चोवीस तास बंदोबस्तासाठी असतात. या सर्वांसाठी दैनदिन वापरासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचे किट मिळावे, अशी मागणी पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी पुनीत बालन यांच्याकडे केली होती. बालन यांनी तत्काळ हे किट देण्याची मागणी मान्य केली आणि लगेच उपलब्ध करून देण्याची व्यवस्थाही केली. ग्रुपच्या माध्यमातून खेळाडू, विद्यार्थी, कलाकार, कर्मचारीवर्ग आणि पोलिस कर्मचारी वर्ग यांच्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. ‘वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा. या वारकरी बांधवांची सुरक्षा राखण्यासाठी येणाऱ्या पोलिस बांधवासाठी दैनदिन वापराच्या वस्तूंचे किट देण्याची संधी मिळणे म्हणजे एकप्रकारे विठ्ठलाची सेवा करण्याची संधी, अशीच माझी भावना आहे. या सर्वाना सर्वोतोपरी मदत करण्याचे माझे नेहमीची प्रयत्न राहतील,’ असे पुनीत बालन सांगतात.
प्रेमविवाह…
५ फेब्रुवारी २०२२ रोजी पुनीत बालन आणि जाह्नवी धारिवाल विवाहबद्ध झाले. दोघांचा प्रेमविवाह आहे. २६ जानेवारी २०२२ रोजी दोघेही काश्मीरमधील शोपियान भागात ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’तर्फे उभारण्यात आलेल्या १५० फूट उंचीच्या तिरंग्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित होते. प्रमुख लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. दोघे जण निघाले असताना अर्ध्या तासाच्या अंतरातच त्यांना निरोप आला, की कार्यक्रमस्थळापासून एक किलोमीटरवर दहशतवादी हल्ला झाला आहे. आपण किती संवेदनशील भागात सामाजिक कार्य करीत आहेत, याची बालन यांना पूर्ण कल्पना आहे. त्यातील धोके पत्करूनही हा वसा पुढे सुरू ठेवण्याचा आपला दृढनिश्चय आहे, असे पुनीत बालन ठामपणे सांगतात.
विविध क्षेत्रामधील उल्लेखनीय कामे…
– पुनीत बालन जवळपास आठ स्पोर्ट्स लीगच्या संघांची जबाबदारी पेलतात.
– देशपातळीवर विविध क्रीडाप्रकारांतील ६० ॲथलिट्सना कौशल्य जोपासण्यासाठी येत्या पाच वर्षांसाठी ३० कोटी रुपयांची मदत
– पुणे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना आधार
– भाऊसाहेब रंगारी वाड्याचे पुनर्निर्माण
– पुनीत बालन यांच्या वतीने ‘केदार जाधव क्रिकेट अॅकॅडमी’ चालविली जाते.
– मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांसाठी दरवर्षी ‘सेलिब्रिटी प्रीमियर लीग’चे आयोजन केले जाते
– ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तब्बल २२ हजार सायकलींचे वाटप
– पुणे आणि सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांत जवळपास १० हजार संगणकांचे वाटप
– १,०८७ शाळांत वाचनालये सुरू केली आहेत.
– ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’मध्ये (आयसर) २०१८ पासून इंद्राणी बालन सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटर सुरू
– पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी या गावातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी दोन लाख लिटर क्षमतेचे तळे तयार केले.
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिस अधिकारी व्हायचय?
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
- संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…