
पुणे! नामांकित डॉक्टरने घेतला गळफास; सुसाईड नोटमध्ये लिहिलं…
पुणे : पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरात एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील दंत वैद्यकशास्त्र विभागप्रमुखाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. ६) घडली आहे. डॉ. राजू पाटील (वय ४५) असे या मृत प्राध्यापकाचे नाव असून, या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
डॉ. पाटील हे शहरातील एका प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठ पदावर कार्यरत होते. शुक्रवारी दुपारी त्यांचे कुटुंबीय बाहेर असताना त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. दुपारी जेव्हा त्यांची पत्नी घरी परतली तेव्हा पतीला लटकलेल्या अवस्थेत पाहून त्यांना मोठा धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळी एक ‘सुसाईड नोट’ (चिठ्ठी) सापडली आहे. प्राथमिक तपासानुसार, डॉ. पाटील यांनी कामाच्या अति ताणामुळे आत्महत्या करत असल्याचे त्यात नमूद केले आहे. मोठ्या हुद्द्यावर असूनही कामाचा मानसिक ताण एका तज्ज्ञ डॉक्टरला अशा निर्णयापर्यंत घेऊन गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

सिंहगड रस्ता पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, डॉ. पाटील यांच्या सहकाऱ्यांची आणि कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
पुणे! जुन्या वादातून गोळीबाराचा थरार! पिस्तूलासह दोघांना अटक…
नांदेड! प्रेमप्रकरणातून युवकाची अमानुष मारहाण करून हत्या…
पुणे! शिवाजीनगर न्यायालयात महिला वकिलांमध्ये हाणामारी; तोंडावर मारला ठोसा अन्…
पुणे! वृद्धाला ‘व्हर्च्युअल कोर्टरूम’मध्ये डिजिटल अरेस्ट करणारे दोघे ताब्यात…

