कमला नेहरू रुग्णालयात पत्रकाराच्या वाहनाची जाणीवपूर्वक तोडफोड…

पुणेः पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या कमला नेहरू रुग्णालयात पत्रकाराच्या वाहनाची जाणीवपूर्वक तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कमला नेहरू रुग्णालयाशी संबंधित बातमी पत्रकाराने प्रकाशित केली होती. या प्रकरणाचा राग मनात धरून फक्त पत्रकाराच्या वाहनाचे टायर फोडून मोठे नुकसान करण्यात आले आहे. संबंधित क्षेत्र सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली असल्याने सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीवर कडक कारवाई करावी, अन्यथा आंदोलन केले जाईल, अशी मागणी पत्रकारांनी केली आहे.

फरासखाना पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले. यावेळी त्यांनी चौकशी करून आरोपीवर कडक कारवाई केली जाईल, असे सांगितले. दरम्यान, पुणे शहरचे नवे पोलिस आयुक्त अमितेश कुमार ऍक्शन मोडवर असून, सलग दोन दिवस पुणे पोलिस आयुक्तालयात गुन्हेगारांची परेड काढली. कुख्यात गँगस्टरसह जवळपास रोज दोन दिवस साधारण तीनशे गुंडाना पोलिस आयुक्तालयात बोलवून त्यांना पोलिसी भाषेत समज दिली जात आहे. गँगस्टरनंतर नार्कोटिक्स पेडलर अर्थात अंमली पदार्थाची बेकायदा विक्री करणारे रेकॅार्डवरचे गुन्हेगार, बेकायदा शस्त्र विक्रीत आरोपी असेलेले गुन्हेगार बोलवून बुधवारी पुणे पोलिसांनी झिरो टॅालरन्स पॅालिसी सुरू केली. तिसऱ्या दिवशी क्राईम रिलस्टार अर्थात रायझिंग क्रिमीनल शोधून त्यांची शाळा घेतली जाणार असल्यामुळे गुन्हेगारांना धडकी भरली आहे.

पुणे पोलिस आयुक्तपदाचा अमितेश कुमार यांनी स्विकारला पदभार…

पोलिस आयुक्त अमितेश कुमार ऍक्शन मोडवर; गुन्हेगारांमध्ये धडकी…

कोंढवा पोलिसांनी तडीपार आरोपीच्या आवळल्या मुसक्या…

पुणे शहरात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथका १ ची धडाकेबाज कारवाई…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!