प्रियकराला लॉजवर बोलवले अन् कापला प्रायव्हेट पार्ट…

लखनौ (उत्तर प्रदेश): प्रियकराला लॉजवर बोलवले आणि प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या युवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दोघेही सज्ञान असून, त्यांच्यात गेल्या 8 वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. दोघांच्या जबाबात काही गोष्टींची पडताळणी व्हायची आहे, त्यानंतरच संपूर्ण प्रकरण उघड होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

प्रियकर आणि प्रेयसीचे गेल्या 8 वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते, मात्र नंतर प्रियकराचे लग्न दुसऱ्या ठिकाणी निश्चित करण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या प्रेयसीने हे कृत्य केले आहे. दोघेही चारथावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुऱ्हेडी गावचे रहिवासी आहेत. मेरठ जिल्ह्यातील सिवाल खास गावात प्रियकर एहतशामचे लग्न एका मुलीसोबत निश्चित झाले होते. प्रेयसी हिनाने रविवारी प्रियकर एहतशामला भेटण्याच्या बहाण्याने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. यादरम्यान दोघांमध्ये यावरून वाद झाला आणि रागाच्या भरात तिने प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट कापला. पोलिसांनी दोघांनाही रक्तबंबाळ अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

युवतीने सांगितले की, हॉटेलमध्ये भांडण झाल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला होता, यावेळी प्रियकराने हस्तक्षेप केला, ज्यामुळे मुलीच्या हातावरही कट पडला.’ आरोपी प्रेयसीने फसवणूक करून प्रियकराला हॉटेलमध्ये भेटायला बोलावले असता तिने ही घटना घडवली. त्यादरम्यान प्रेयसीने प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टवर धारदार शस्त्राने वार केले. यामुळे प्रियकरासह आरोपी प्रेयसीही या घटनेत जखमी झाली. दरम्यान, दोन्ही बाजू आपापली मते मांडत आहेत. त्यांचे सीडीआर आणि इतर रेकॉर्ड पाहिल्यानंतरच हे कळेल, असे पोलिसांनी सांगितले.

महिलेने धारदार शस्त्राने कापला युवकाचा प्रायव्हेट पार्ट…

संतापजनक! 2 वर्षीय मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाटणं घुसवलं अन् मारलं…

संतापजनक! पत्नीने कापला पतीचा प्रायव्हेट पार्ट…

हॉटेलमध्ये ग्राहकाच्या प्रायव्हेट पार्टला चावला विंचू तब्बल चार वेळा…

प्रियकराला घरी बोलावून प्रायव्हेट पार्टवर केले ब्लेडने वार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!