
Video: टॅक्सीत विद्यार्थिनीसमोर हस्तमैथून करणाऱ्याला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून ठोकल्या बेड्या…
मुंबईः मुंबईमध्ये शेअर टॅक्सीमध्ये बसलेल्या युवकाने विद्यार्थिनीसमोर हस्तमैथून केले होते. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. विकृत युवकाला गावदेवी पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या महिन्यात ३० नोव्हेंबरला आरोपीने हा प्रकार केला होता. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला उत्तर प्रदेशात बेड्या ठोकल्या आहेत.
दिनदयाळ मोतीराम सिंह असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवाशी असून तो मुंबईत सायन इथे राहत होता. एका फरसाणच्या दुकानात तो कामाला होता. घटनेच्या दिवशी ३० नोव्हेंबरला आरोपी दिनदयाळ मुंबईतील ग्रँट रोड परिसरात गेला होता. यावेळी कंबाला हिल बसस्टॉपवरून एक कॉलेजची युवती या शेअरिंग टॅक्सीत चढली. तिलाही ग्रँट रोड बस स्थानकावर जायचे होते. आरोपी दिनदयाळ याने टॅक्सीतून प्रवास करत असताना पीडित युवतीकडे पाहून अश्लील कृत्य करायला सुरुवात केली. या प्रकारामुळे पीडित युवती प्रचंड घाबरली होती. पण हा सगळा प्रकार टॅक्सीत पीडितेसोबत असलेल्या मित्राने आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गावदेवी पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी पीडित युवतीच्या मित्राशी संपर्क साधला आणि सर्व घटनाक्रम जाणून घेतला. यानंतर १२ डिसेंबरला पोलिसांनी पीडित युवतीचा जबाब नोंदवत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवायला सुरुवात केली. त्याची ओळख पटताच आरोपी उत्तर प्रदेशला आपल्या मूळगावी पळून गेल्याची माहिती गावदेवी पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याने विनयभंग केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
View this post on Instagram
Video: टॅक्सीत महाविद्यालयीन विद्यार्थिनीसमोर युवकाने केले हस्तमैथून…
विकृती! मेट्रोत महिलांसमोरच केले हस्तमैथून; Video Viral…
विकृती! हस्तमैथून करून महिलांच्या अंतरवस्त्रावर टाकायचा वीर्य…
संतापजनक Video: आईस्क्रीमवाला हस्तमैथुन करून ग्लासमध्ये टाकत होता वीर्य…
विकृती! प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लघवी करायचा अन् विकायचा फळं…
विकृती! कॅब चालकाने महिलेची छेड काढताना पॅंटची चेन उघडली अन्…

