
सांगली जिल्ह्यात माजी उपसरपंचाची रस्त्यातच गळा चिरून हत्या…
सांगली : सांगलीत माजी उपसरपंचाची रस्त्यात गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माजी उपसरपंच आणि सराफ व्यावसायिक बापूराव देवाप्पा चव्हाण असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
बापूराव देवाप्पा चव्हाण यांच्यावर हल्ला करणाऱ्यांनी घटनास्थळावरून पलायन केले आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजता गार्डी इथल्या नेवरी रस्त्यावर ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बापूराव चव्हाण यांचे विट्यात सराफ दुकान आहे. याशिवाय गार्डी ते नेवरी रस्त्यावर पोल्ट्रीचा व्यवसाय आहे. २०१८ ते २०१३ या काळात ते घानवड गावचे उपसरपंच होते. गुरुवारी दुपारी तीन वाजते ते गार्डी ते नेवरी रस्त्याने दुचाकीवरून निघाले होते. तेव्हा गावच्या बाहेरच त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. गळ्यावर चाकूने वार करत हत्या केली.
बापूराव चव्हाण यांच्या हत्येनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर मृतदेह पंचनाम्यासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
पंधरा वर्षापूर्वी प्रेमविवाह अन् पत्नीने केली पतीची हत्या…
कोल्हापूर जिल्ह्यात विषबाधेनं दोन घटनांत पाच जणांचा मृत्यू; दोन सख्खे भाऊ अन् दोन…
पुणे जिल्ह्यात पतसंस्थेच्या अध्यक्षा महिलेची चाकूने वार करून हत्या…
पुणे! वडिलांना ‘टकल्या’ म्हणाला म्हणून दगडाने ठेचून केला खून…
पुणे! लिव्ह इनमधील प्रेयसीच्या खूनाचे कारण सांगितले आरोपीने…

