पुणे शहरातील तडीपार आरोपीस दरोडा व वाहन चोरीच्या पथकाने घेतले ताब्यात…

पुणे (संदिप कद्रे): दरोडा व वाहन चोरी १ पथकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने चतुर्शिंगी पोलिस ठाणे रेकॉर्ड वरील तडीपार आरोपीला ताब्यात घेतले आहे.

दरोडा व वाहन चोरी १ पथकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी व अंमलदार असे पाहिजे / फरार आरोपीचे अनुषंगाने हद्दीत 24/10/2024 रोजी गस्त घालत होते. गस्ती दरम्यान पोलिस अंमलदार अमित गद्रे यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराबाबत बातमी मिळाली की, चतुर्शिंगी पोलिस ठाणे रेकॉर्ड वरील तडीपार आरोपी अनिकेत राजेंद्र नायडू (वय ३० वर्षे रा. धर्म नगर जनता वसाहत जनवाडी गोखले नगर पुणे) हा तडीपार आदेशाचा भंग करून, मॉडेल कॉलनी शिवाजीनगर पुणे येथे आल्याचे माहिती मिळाली.

पोलिस शिपाई अमित गद्रे, पोलिस हवालदार बाळू गायकवाड, पोलिस हवालदार अजित शिंदे, पोलिस हवालदार गणेश ढगे, पोलिस शिपाई अक्षय गायकवाड या पथकाने सदर आरोपीस ताब्यात घेऊन अधिक चौकशी करता त्यानी चतुर्शिंगी पोलिस स्टेशन तडीपार आदेश क्रमांक ४१/२०२३ दिनांक १३/१०/२०२३ पासून दोन वर्षाकरीता पुणे शहर आयुक्तालय पिंपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हा बाहेर दोन वर्षे करिता सोलापूर येथे तडीपार केले आहे. तो सध्या तडीपार असल्याची कबुली दिल्याने त्यास गुन्ह्याचे तपासकामी पुढील कार्यवाही करीता शिवाजीनगर पोलिस स्टेशन पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले.

पुण्यात 138 कोटी रुपये किमतीचे सोनं आलं कुठून? महत्त्वाची माहिती…

मामा टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना सिंहगड रोड पोलिसांनी केली अटक…

झारखंड व पश्चिम बंगाल बॉर्डरवरील गंगा नदीतील बेटावरून अपहृत व्यक्तीची पोलिसांनी केली सुखरुप सुटका…

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने पकडले तीन जणांना…

मनोधैर्य योजना! ‘बोपदेव घाट’ प्रकरणातील पीडित युवतीला नुकसान भरपाई…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!