अहमदनगरमध्ये अत्याचार करून अंगणवाडी सेविकेचा खून

अहमदनगर : एका गावात गुरुवारपासून बेपत्ता असलेल्या अंगणवाडी सेविकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने अंगणवाडी सेविकेचा मृतदेह फरफटत नेऊन नदीच्या पाण्यात फेकून दिल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याने आहे. त्याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली आहे. सुभाष बंडू बर्डे (वय 25, रा. कुक्कडवेढे, ता. राहुरी; हल्ली रा. चिचोंडी पाटील) असे त्याचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी  संबंधित अंगणवाडी सेविका गुरुवारी (दि. 24) सकाळी नेहमीप्रमाणे अंगणवाडीत गेली. मात्र, दुपारी उशिरापर्यंत घरी न आल्याने नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला. नातेवाईक व काही ग्रामस्थ अंगणवाडीत गेले असता, अंगणवाडीला बाहेरून कुलूप होते. त्यांनी कुलूप तोडले असता अंगणवाडीच्या आत फरशीवर सर्वत्र सक्ताचा सडा पडलेला होता.

ते पाहून नगर तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने जाऊन परिसरात पाहणी केली असता घटनास्थळापासून काही अंतरावर काहीतरी ओढत नेल्याच्या खुणा दिसत होत्या. पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीणचे उपअधीक्षक संपतराव भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर, सहायक निरी8क्षक प्रल्हाद गिते, सहायक निरीक्षक हेमंत थोरात घटनास्थळी गेले. स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे निर्देश अधीक्षक ओला यांनी दिले. पोलिस निरीक्षक आहेर यांना खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीनुसार, तसेच तांत्रिक विश्लेषणानुसार हा गुन्हा सुभाष बर्डे याने केल्याची माहिती मिळाली. पथकाने बर्डे याला रात्रीतून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अत्याचार व खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह अंगणवाडीशेजारील नदीपात्रात टाकून दिल्याचे त्याने सांगितले.

निरीक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक थोरात, अंमलदार बबन मखरे, फुरकान शेख, शरद बुधवंत, सोमनाथ झांबरे, संतोष खैरे, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड, अमोल कोतकर, चंद्रकात कुसळकर, विजय ठोंबरे, उदय घोडके, मेघराज कोल्हे यांच्या पथकाने संशयित आरोपी सुभाष बर्डे याला अटक केली. त्याला तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोषण आहार घेण्यासाठी आला आणि…
सुभाष बर्डे याला त्याच्या मुलीच्या पोषण आहाराचे साहित्य घेण्यासाठी अंगणवाडी सेविकेने अंगणवाडीत बोलावले होते. तो दुपारच्या वेळी तेथे गेला, त्या वेळी सेविकेला एकटीला पाहून त्याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यास सेविकेने प्रतिकार केला असता झटापटीत बर्डे याने त्यांचे डोके भिंतीवर आपटले.

त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, त्याने सेविकेवर अत्याचारदेखील केल्याची कबुली दिली आहे. सुरुवातीला अपहरणाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात अत्याचार व खुनाचे वाढीव कलम लावल्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी सांगितले.

हॅलो, तिकीटासाठी 50 लाख द्या, आमदाराला दिल्लीतून फोन; दोघे ताब्यात…

पुण्यात 138 कोटी रुपये किमतीचे सोनं आलं कुठून? महत्त्वाची माहिती…

पोलिसकाकाची जिममधून आल्यावर प्रकृती बिघडली अन् घेतला जगाचा निरोप…

चोर परदेशात अन् चोरी पुण्यात? आरोपीस सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर…

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने पकडले तीन जणांना…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!