गुजरातमध्ये पाच वर्षे सुरू होते बनावट न्यायालय; वकीलच बनला न्यायाधीश अन्…

अहमदाबाद (गुजरात): जगभरात तोतया अधिकारी, आयपीएस, पोलिस अथवा सरकारी अधिकारी बनून फसवणूक केल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. पण, गुजरातमध्ये चक्क बनावट न्यायालय आढळून आले असून, न्यायालयात बनावट न्यायाधीश, बनावट कोर्टरूम आणि बनावट वकीलसुद्धा होते. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

गुजरातमधील एका बनावट न्यायालयाचा पर्दाफाश झाला आहे. धक्कादायक म्हणजे हे न्यायालय गेल्या पाच वर्षांपासून सुरू होते. जेव्हा या बनावट न्यायालयाने आदेश जारी केले आणि ते डीएम कार्यालयात पोहोचले तेव्हा ते मंजूरसुद्धा केले गेले.

पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव मॉरिस सॅम्युअल असे आहे. तो वकील असून लोकांना आपल्या जाळ्यात ओढायचे काम तो करायचा. त्याच्याकडे जमिनीशी संबंधित प्रकरणं असायची. सॅम्युअलवर आरोप आहे की, तो आपल्या क्लायंटना न्यायालयात न जाता बाहेरच तडजोड करायला लावत असे. असाच सल्ला त्याने एकाला दिला होता. त्यासाठी तो ठराविक रक्कमही घेत होता. ११ पेक्षा जास्त प्रकरणं त्याने आपल्या बाजूने निकाल लावून घेतली आहेत. यात १०० एकर सरकारी जमीन स्वत:च्या नावावर केल्याचा आरोपसुद्धा आहे.

पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर अहमदाबाद सिटी सिविल कोर्टात प्रकरण सुनावणीला गेल्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला आहे. मॉरिस सॅम्युअल याने २०१९ पासून अनेक प्रकरणांचा निकाल दिला आहे. यात गांधीनगर परिसरातील जमीनीच्या व्यवहारांचा समावेश आहे. एका प्रकरणात मॉरिसने स्वत:लाच मध्यस्थ म्हणून नियुक्त केले असल्याचे क्लायंटला सांगितले. पण भादरा इथल्या सिटी सिविल कोर्टातील रजिस्ट्रार हार्दिक देसाई यांनी अहमदाबादच्या करंज पोलिस ठाण्यात मॉरिसविरोधात तक्रार दाखल केली. तेव्हा माहिती समोर आली की मॉरिस हा मध्यस्थसुद्धा नाही आणि त्याने दिलेला आदेशसुद्धा खरा नाही. त्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! शरीर संबंधानंतर रक्तस्त्राव झाल्याने प्रेयसीचा मृत्यू; अन् प्रियकर…

अभिनेत्री प्रकरण! तीन IPS अधिकाऱ्यांचे निलंबन…

हृदयद्रावक! लग्नासाठी मुलगी बघायला निघाला अन् मृत्यू झाला…

IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचे गुंडासोबत प्रेमसंबंध अन् नवऱ्याच्या घरासमोरच दिला जीव…

पवित्र नात्याला काळिमा! शिक्षकाच्या फोनमध्ये सापडले 45 अश्लील व्हिडीओ…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!