
अजितदादा गटातील नेत्याला टोळक्याने धारदार शस्त्रांनी वार करुन संपवलं…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावर टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागे त्यांच्यावर शुक्रवारी (ता. ४) धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावर शुक्रवारी अज्ञाताने हल्ला केला. रात्री हल्ला झाल्यानंतर तत्काळ कुर्मी यांना जेजे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शिवाय, या हत्येमुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. आरोपींना तात्काळ पकडण्याची मागणी होत आहे. सचिन कुर्मी यांच्यावर कोणी आणि कोणत्या कारणासाठी हल्ला केला हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सचिन कुर्मी हे जखमी अवस्थेमध्ये पडले होते. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या गाडीतून उपचारांसाठी जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी कुर्मी यांना मृत घोषित केले.
दरम्यान, सचिन कुर्मी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळ यांचे जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते, या घटनेची माहिती मिळताच ते मुंबईला रवाना झाले आहेत. ते आज कुर्मी कुंटूबांची भेट घेणार आहेत.
माजी क्रिकेटपटू सलील अंकोला याच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह…
मुंबईत CSMT परिसरात महिलेवर सामूहिक बलात्कार…
पुणे शहरातील बोपदेव घाटात गँगरेप करणाऱ्या आरोपींचे स्केज जारी; संपर्क…
Video: जवानाचा मृतदेह मिळाला तब्बल ५६ वर्षांनी…
अभिनेता गोविंदा गोळीबार प्रकरणात पोलिसांना वेगळाच संशय…

