जय मालोकर याच्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर; अमोल मिटकरी म्हणाले…

अकोला: अकोला जिल्ह्यात मनसे कार्यकर्ता जय मालोकार याच्या मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. शवविच्छेदन अहवालात जय मालोकार याचा मृत्यू जबर मारहाणीने झाल्याचे या अहवालात उघड झाले आहे.

अकोला येथील शासकीय विश्रामगृह येथे मनसे कार्यकर्ते आणि अमोल मिटकरी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये 30 जुलैला राडा झाला होता. मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली होती. यानंतर गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांपैकी जय मालोकार याचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे, तर मृत्यूच्या आधी जय नेमका कोणासोबत होता, त्याला कुठे-कुठे नेण्यात आले सर्वांचे कॉल डिटेल्स चेक करा आणि त्याला न्याय द्या, असे त्यांनी म्हटलं आहे.

अमोल मिटकरी म्हणाले, ‘मी आताच ही बातमी ऐकली की अकोल्या जिल्ह्यात एका मनसेच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. आधी असे दाखविण्यात आले होते की, हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पण, आता शवविच्छेदन अहवालामध्ये वेगळं समोर आले आहे. त्यांच्या कुटुंबाकडून आता सुरक्षेची मागणी केली आहे, त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा देण्यात यावी. मनसे कार्यकर्ता जय मालोकार याच्या कुटुंबाच्या समोर सत्य आले पाहिजे. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी त्यांच्या कुटुंबांना सुरक्षा द्यावी.’

‘मी जर दोषी असेल, माझे कार्यकर्ते दोषी असतील तर आम्हाला फासावर द्या, यामध्ये राजकारण करायचे नाही आणि कोणी करूही नका. मृत्यूच्या आधी जय नेमका कोणासोबत होता. त्याला कुठे-कुठे नेण्यात आले या सर्वांचे कॉल डिटेल्स चेक करा आणि न्याय द्या. ज्या दिवशी मृत्यू झाला, त्या दिवशीच मी म्हटले होते की, सविस्तर चौकशी करायला हवी. चौकशीतून दूध का दूध पाणी का पाणी व्हायला हवे, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

जय मालोकार याच्या शवविच्छेदन अहवालात…
जयला जबर मारहाण झाली. पाठीवर छातीवर डोक्यावर आणि मानेवर जबर मारहाण.
छातीच्या चार ते पाच बरगड्या मागच्या बाजूने फ्रॅक्चर.
डोक्याला सुद्धा गंभीर मारहाण झाली आहे. पोस्टमार्टमवेळी मेंदूवर मोठ्या प्रमाणात सूज. त्यामुळे मेंदूचे वजन वाढले.
मानेवर जबर मारहाणीमुळे त्याच्या मज्जातंतूना गंभीर इजा.
या सर्व गोष्टींमुळे ‘न्यूरोजनिक शॉक’मुळे मृत्यू.

बदलापूर प्रकरण! अक्षय शिंदे याची दुसरी पत्नीही आली समोर: म्हणाली लिंगपिसाट…

धक्कादायक! पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून वर्गातील मुलाने केली महिलेची हत्या…

बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन चिरला पत्नीच्या प्रियकराचा गळा अन्…

नाशिक हादरलं! चिमुकलीला विष पाजून पती-पत्नीची आत्महत्या; घरात…

पुणे शहरातील एकाने पत्नीला Live Location बरोबरच मेसेज केला अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!