अभिनेत्री प्रकरण! तीन IPS अधिकाऱ्यांचे निलंबन…

हैद्रबाद (आंध्र प्रदेश): मुंबईतील अभिनेत्री आणि मॉडेलला चुकीच्या पद्धतीने अटक आणि छळ केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

मुंबईतील मॉडेल आणि अभिनेत्री कादंबरी जेठवानी हिला चुकीच्या पद्धतीने अटक केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने मोठी कारवाई केली आहे. आंध्र प्रदेश सरकारने पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यासह तीन आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. अभिनेत्री कादंबरी जेठवानी हिच्या तक्रारीनंतर आंध्र प्रदेश सरकारने माजी गुप्तचर प्रमुख पी. सीताराम अंजनेयुलू (डीजी रँक), माजी विजयवाडा पोलिस आयुक्त क्रांती राणा टाटा (महानिरीक्षक दर्जा) आणि माजी पोलिस उपायुक्त विशाल गुन्नी (अधीक्षक दर्जा) यांना निलंबीत केले आहे. तपासाअंती या अधिकाऱ्यांवर अभिनेत्रीचा छळ केल्याचा आरोप सिद्ध झाला असून, त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

मुंबईतील रहिवासी असलेल्या कादंबरी जेठवानी हिने ऑगस्टमध्ये एनटीआरचे पोलीस आयुक्त एस.व्ही. राजशेखर बाबू यांच्याकडे रीतसर तक्रार केली होती. त्यात त्यांनी वायएसआर काँग्रेस पक्षाचे नेते आणि चित्रपट निर्माते विद्यासागर यांनी फेब्रुवारीमध्ये त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता, असे म्हटले होते. विद्यासागर यांच्यासह उच्च पोलीस अधिकाऱ्यांनी छळ केला आणि मला अटक केली आणि कोणतीही पूर्वसूचना न देता मुंबईहून विजयवाडा येथे आणले. पोलिसांनी कुटुंबियांचा अपमान केला आणि बेकायदेशीरपणे मला आणि वृद्ध पालकांना ताब्यात घेतले आणि कुटुंबाला ४० दिवसांपेक्षा जास्त काळ न्यायालयीन कोठडीत राहण्यास भाग पाडले, असा आरोप कादंबरी जेठवानी हिने केला होता.

जेठवानी आणि त्यांच्या कुटुंबाला अडकवण्यासाठी जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप श्रीनिवास यांनी केला आणि पोलिसांनी त्यांना अनेक दिवस जामीन अर्ज दाखल करू दिला नाही. त्यानंतर आता आंध्र प्रदेश सरकारने तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाचा आदेश जारी केला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात असेही समोर आले आहे की, पी. सीताराम अंजनेयुलू यांनी अभिनेत्रीच्या अटकेसाठी सूचना दिल्या होत्या. तर आधी एफआयआर नोंदवण्यात आला नव्हता. ३१ जानेवारी रोजी अटकेचे निर्देश जारी करण्यात आले असताना नंतर २ फेब्रुवारी रोजी एफआयआर दाखल करण्यात आला

कादंबरी जेठवानी ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने २०१५ मध्ये फेमिना मिस गुजरात स्पर्धा जिंकली होती. ती फेमिनाची कव्हर गर्ल राहिली आहे. तिने हिंदी, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमधील अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. तिने मल्याळम आणि पंजाबी चित्रपटांमध्ये तसेच मॉडेलिंगमध्येही काम केले आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांची आत्महत्या…

अभिनेत्रीचा लैंगिक छळ प्रकरणी दोन अभिनेत्यांविरोधात गुन्हा दाखल…

अभिनेते अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरी करणारा गजाआड…

प्रसिद्ध अभिनेत्याला खुनाच्या आरोपाखाली अटक…

अभिनेत्री रविना टंडन हिने नशेत केली धक्काबुक्की? पोलिसांनी सांगितले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!