अजब घटना! पती नोकरीनिमित्त बाहेरगावी अन् पत्नीने केला १२ वेळा गर्भपात…

रायपूर (छत्तीसगड) : पती नोकरीनिमित्त बाहेरगावी असतानाही पत्नीने 8 ते 12 वेळा गर्भपात केल्याची एक अजब घटना समोर आली आहे. उच्च न्यायालयाने हे घटस्फोटासाठीचे कारण मानले आहे. पती-पत्नीमधील समेटाचा मार्ग बंद झाल्याने न्यायालयाने पतीची याचिका मान्य करून घटस्फोट मंजूर केला.

याचिकाकर्त्या पतीने दुर्ग जिल्ह्यात राहणाऱ्या मुलीशी रितीरिवाजांनुसार 1996 मध्ये लग्न केले होते. 2005 मध्ये नवरा कामानिमित्त बाहेर महाराष्ट्रात गेला. त्यानंतर त्याची केरळला बदली झाली. 2006 मध्ये मुलीचा जन्म झाला. दरम्यान, पत्नी दुसऱ्या पुरुषाच्या संपर्कात आली आणि पती सोबत नसतानाही पत्नीने 8 ते 12 वेळा गर्भपात केला. प्रत्येक वेळी पतीऐवजी तिचा प्रियकर रुग्णालयात तिच्यासोबत राहिला. पतीने तडजोड केली आणि तिला सोबत ठेवण्यास तयार झाला. परंतु, पत्नीने प्रियकरासोबत संपर्क कायम ठेवला. पतीने घटस्फोटासाठी दुर्ग कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला. मात्र, तोंडी पुराव्याच्या आधारे पतीचा अर्ज फेटाळण्यात आला.

यावर पतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि न्यायमूर्ती रजनी दुबे यांच्या डीबीमध्ये या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने पत्नीचा 8 ते 12 गर्भपात झाल्याचा वैद्यकीय अहवाल, पतीचा भाऊ आणि तिच्या मोलकरणीचे जबाब हे ठोस पुरावे मानले आणि पतीची घटस्फोटाची याचिका मान्य केली.

वाईट नजर! वहिनीच्या बेडरूममध्ये घुसला दीर अन् पुढे…

Video: मामीने पळून जात बांधली भाचीशी लग्नगाठ; 3 वर्षांपासून रोमान्स…

नात्याला काळीमा! अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समजताच आईला बसला धक्का…

आत्याने भाच्यासोबत ठेवले अनैतिक संबंध अन् गरोदरानंतर मिळाली मोठी शिक्षा…

हृदयद्रावक! गरोदर महिलेची आत्महत्या; पोटातील बाळही दगावले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!