प्रेम प्रकरणात पतीचा अथडळा म्हणून खून; आरोपींना घाटंजी पोलिसांनी केली अटक…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी पोलिस स्टेशन अंतर्गत राजुरवाडी येथे प्रेम प्रकरणात पती प्रभाकर मारवाडी याचा अडथळा निर्माण होत असल्याने त्याचा गळा आवळून खून करण्यात आला.

या प्रकरणी फिर्यादी सुधाकर कवडूजी मारवाडी (वय 46, रा. राजूरवाडी ता. घाटंजी) यांच्या जबानी रिपोर्ट वरुन आरोपी प्रियकर सुरज रोहणकर (वय 28) व जयश्री प्रभाकर मारवाडी (वय 28) विरुद्ध भान्यासं कलम 103, 3 (5) अन्वये घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. तथापि, दोन्ही आरोपींना आज घाटंजी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करुन त्यांची पोलिस कोठडी मागणार असल्याचे तपास अधिकारी तथा पोलिस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे यांनी सांगितले.

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजूरवाडी येथील मृतक प्रभाकर मारवाडी याचा जयश्री मारवाडी सोबत विवाह झाला होता. मात्र, आरोपी सुरज रोहणकर व प्रभाकरची पत्नी जयश्री प्रभाकर मारवाडी हिचे अनेक दिवसांपासून प्रेम संबंध होते. सुरज रोहणकर व पत्नीचे अनैतिक संबंध असल्याची माहिती पती प्रभाकर मारवाडी यांस झाल्याने पती पत्नी मध्ये नेहमी खटके उडायचे. त्यामुळे पती प्रभाकर मारवाडी याचा गळा आवळून खून करण्यात आला. घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे पुढील तपास करीत आहे.

पोलिसकाका Video News: २७ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सश्रम कारावास…

‘सैराट’ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून युवकाची हत्या…

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!