दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणे यांची होणार चौकशी…

मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात भाजप नेते नितेश राणे यांची चौकशी होणार आहे. आमदार नितेश राणे यांनी दिशाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात चौकशीची मागणी केली होती.

दिशा सालियन हिची आत्महत्या नसून हत्या आहे असा दावा राणे यांनी केला होता. याची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी नागपूर अधिवेशनात त्यांनी केली होती. यानंतर सालियन हत्येप्रकरणी आपल्याकडे पुरावे असल्याचाही नितेश राणे यांनी दावा केला होता. मुंबई पोलिसांकडून नितेश राणे यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबई पोलीस आमदार नितेश राणे यांची चौकशी करणार आहेत.

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आपल्याला काही माहिती असल्यास ही माहिती मांडण्याकरता मालवणी पोलीस स्टेशनमध्ये चौकशी पथकातील अधिकाऱ्यांच्या समक्ष उपस्थित राहावं, असं या नोटीसमध्ये लिहिण्यात आले आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी समन्स आल्यानंतर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिशा सालियानचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट अद्याप बाहेर का आला नाही? नितेश राणे जर खोटं बोलत असेल तर आदित्य ठाकरे यांनी सांगावे. आम्ही पुण्याच्या अग्रवालला सोडलं नाही, मिहिर शाहला सोडलं नाही आणि आदित्य ठाकरेंनाही सोडणार नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

दरम्यान, नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये दिशा सालियान मृत्यूप्रकरणी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली होती, यानंतर आता या एसआयटीसमोर नितेश राणे उपस्थित राहणार आहेत.

दिशा सालियान प्रकरण! आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता…

अभिनेते अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरी करणारा गजाआड…

अभिनेत्री रविना टंडन हिने नशेत केली धक्काबुक्की? पोलिसांनी सांगितले…

अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी छत्तीसगडमधून घेतले ताब्यात…

राज कुंद्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीला ईडीचा दणका; कोट्यावधींची संपत्ती जप्त…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!