धक्कादायक! जावयाने सासूचे हात-पाय बांधून घात केला…

मुंबई : विरारमध्ये कौटुंबिक वादातून जावयाने सासूची हत्या केल्याची घटना बुधवारी (ता. १९) दुपारी एकच्या सुमारास घडली आहे. हत्या करून पळून जाण्याचा तयारीत असलेल्या आरोपीच्या मुलांनी त्याला घरात कोंडून ठेवल्याने तो पकडला गेला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.

विरार पूर्वेच्या साईनाथ नगर परिसरात मागील तीन महिन्यापासून प्रशांत खैरे हा पत्नी कल्पना खैरे, दोन मुलं व सासू यांच्या सोबत भाड्याच्या घरात राहत होता. प्रशांत याला दारुचे व्यसन असल्याने मद्यपान करून पत्नी कल्पना खैरे व सासू लक्ष्मी खांबे यांना शिवीगाळ करून त्रास देत होता.

policekaka-special-offerपोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

प्रशांत बुधवारी दुपारी दारू पेऊन घरी आला होता. त्यावेळी त्याची पत्नी कामासाठी मुंबईला गेली होती. प्रशांतचा सासू लक्ष्मी बरोबर वाद झाला. याच वादातून प्रशांत खैरे याने सासूचे हात पाय बांधून मानेवर व पोटावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली. हत्या करून प्रशांत पळून जाण्याच्या तयारीत होता. घरात असलेल्या मुलांनी दरवाजाला बाहेरून कडी लावून प्रशांत याला आत डांबले. शिवाय, आरडाओरडा करून नागरिकांना गोळा करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. विरार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

दरम्यान, लक्ष्मी खांबे (वय ६०) या मुलगी आणि नातवासोबत राहत होत्या. त्यांची मुलगी कल्पनाचे (वय 39) हिचे प्रशांत खैरे (वय 41) याच्याशी 2012 साली लग्न झाले होते. प्रशांत हा नेहमी दारु पिऊन कल्पनाला मारहाण करायचा. बुधवारी प्रशांत नेहमीप्रमाणे दारु पिऊन आला. त्यावेळी कल्पना घरी नव्हती. त्यावेळी दारुच्या नशेत असलेल्या प्रशांतने सासूसोबत वाद झाल्यानंतर लक्ष्मी खांबे यांना बेडरुममध्ये नेऊन तोंड, हात-पाय बांधले. यानंतर प्रशांतने चाकूने त्यांच्या मानेवर, पोटावर वार केले. यामध्ये लक्ष्मी खांबे यांचा मृ्त्यू झाला. या घटनेनंतर कल्पनाने विरार पोलिस ठाण्यात आईच्या हत्येप्रकरणी तक्रार देऊन पतीवर गुन्हा दाखल करायला लावला.

जावई म्हणतो सासूला; मला तुझ्याशीच लग्न करायचेय…

सासूने केलेल्या मारहाणीत जावयाचा जागीच मृत्यू…

धक्कादायक! जावयाने पत्नीच्या संशयावरून आख्खी सासुरवाडी संपवली…

अहमदनगर जिल्हा हादरला! जावयाने पत्नी, मेहुणा, आजे सासूची केली हत्या…

जावयाने तोडले सासूचे नाक अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!