पुणे शहरात पत्नीला लॉजवर घेऊन गेला अन् घात केला…

पुणे : पत्नीला लॉजवर घेऊन गेल्यानंतर नवऱ्याने तिच्यावर चाकूने वार करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना भारती विद्यापीठ भागातील लॉजवर घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

काजल कृष्णा कदम (वय २७) असे या घटनेत मृत्यू महिलेचं नाव आहे. महिलेचा आरोपी पती कृष्णा कदम याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये घटस्फोटाचे प्रकरण सुरू होते. मात्र, दोघांनी पुन्हा एकत्र राहण्याचे ठरवले होते. यानंतर पतीने पत्नीला लॉजवर भेटून चर्चा करण्यासाठी बोलवले होते. भारती विद्यापीठ परिसरातील लॉजवर शनिवारी दुपारी दोघेही गेले होते. तिथे त्यांनी मद्यपान केलं. नशेत त्यांचा पुन्हा वाद झाला आणि या वादातून कृष्णाने चाकूने भोसकून पत्नीची हत्या केली. यानंतर तो खोलीला बाहेरून लॉक लावून पसार झाला होता.

मित्रांसोबत मद्यपान करताना त्याने ही गोष्टी मित्रांना सांगितली. याबद्दल ऐकताच मित्र घाबरले आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी लॉजवर जात मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पत्नी काजलचा लॉजवर नेऊन खून केल्याचे समोर आले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरात व्यावसायिकाची गोळ्या झाडून आत्महत्या…

पुणे जिल्ह्यात इमारतीवरून उडी मारून महिलेची आत्महत्या; चॅटिंगवरून…

पुणे जिल्ह्यात लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या; कारण सांगितले…

पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी खुनाची घटना; भरदिवसा महिलेची हत्या…

पुणे शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रानेच केली मित्राची हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!