
पुणे शहरात दिवसाढवळ्या सराफ दुकानात सशस्त्र दरोडा…
पुणे: पुणे शहरातील वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या महंमदवाडी रस्त्यावर सात जणांच्या टोळक्याने दिवसाढवळ्या एका ज्वेलर्स वर दरोडा टाकून तब्बल 300 ते 400 ग्रॅम सोने नेले लुटून नेल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरुन आलेल्या पाच-सात युवकांच्या टोळक्याने थेट सराफ दुकानात घुसून हाती बंदुक घेऊन सराफ दुकान लुटले आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने बीजीएफ ज्वेलर्सवर दरोडा टाकत येथील सोने लुटून नेले आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे दरोडेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. महमदवाडी रस्त्यावर असलेल्या वाडकर मळा येथील बीजीएफ ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींचा शोध सुरू केला असून संबंधित आरोपी कुठल्या गँगचे किंवा ग्रुपचे आहेत का, याचा शोध घेत आहेत. वानवडी विभागाचे डीसीपी आर राजा, गुन्हे शाखा डीसीपी यांच्यासह स्थानिक पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
पुणे शहरातील कंपनीमधील दरोड्यातील आरोपींना अटक; पाहा नावे…
पुणे शहरात दरोडाच्या तयारीत असलेल्या टोळीस युनिट ५ने केले जेरबंद…
पुणे शहरात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथका १ ची धडाकेबाज कारवाई…
पुणे शहरात टोळक्याकडून कोयत्याने वार करत एकाचा निर्घृण खून…
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

