
पुणे शहरात होस्टेलमधील विद्यार्थिनींचे चोरून व्हिडिओ काढून पाठवले मित्राला…
पुणे: पुणे शहरातील प्रसिद्ध सीओईपी (कॉलेज ॲाफ इंजिनिअरींग पुणे ) कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यानींचाचे चोरून व्हिडिओ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आर्या आणि विनीत सुराणा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
सीओईपी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यानींचे चोरून व्हिडिओ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल आल्यानंतर अर्या गिरीश काळे आणि विनीत सुराणा या दोघा जणांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आर्या हिने हॉस्टेलमधील अनेक विद्यार्थिनींचे चोरून व्हिडिओ काढून ते तिचा मित्र विनीत सुराणा याला पाठवल्याची माहिती पुढे आली आहे.
दरम्यान, या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. तसेच पोलिसांत तक्रार दिली आहे. संबधीत विद्यार्थीनीला चौकशी पूर्ण होईपंर्यत या विद्यार्थीनीला निलंबीत करण्यात आले असल्याचे सीईओपी प्रशासनाने सांगितले.
पुणे शहरात बीएएमएस झालेल्या युवतीची लाखो रुपयांची फसवणूक…
पुणे शहरात शिक्षकाकडून विद्यार्थीनीला ‘I Love You’ चा मेसेज अन्…
पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…
पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात युवतीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न…
धक्कादायक! पुणे शहरात छेडछाडीला कंटाळून युवतीने घेतले पेटवून…

