
पोलिसकाका, पुणे पोलिस आयुक्तांची तत्परता! हरवलेली मुलगी सापडली रांजणगावात…
पुणेः पुणे शहरातील नांदेड सिटी येथून मुलगी हरवल्यानंतर सोशल मीडियावरून हरवल्याची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. नेटझन्स पोस्ट व्हायरल करून शोधण्याचे आवाहन करू लागले. दुसरीकडे पोलिसकाकाचे पत्रकार संदिप कद्रे यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधला आणि मदत करण्याचे आवाहन केले. पोलिस आयुक्तांनी तत्पर दखल घेत पोलिस दलाला पाचारण केले आणि पुणे शहरातून हरवलेली मुलगी रांजणगाव गणपती येथे सापडली.
मुलगी सापडल्यानंतर मुलीच्या पालकांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पुणे पोलिस आणि नेटिझन्सचे आभार मानले आहेत. पोलिस दल आणि सोशल मीडियामुळे काय होऊ शकते, याचा अनुभव पुणेकरांना आला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मुलीला शोधून देणाऱ्यांना एक लाख रुपयांचे पारितोषिकही जाहीर केले आहे.
आई रागावली म्हणून बारा वर्षाची मुलगी नांदेड सिटी येथून गुरुवारी (ता. १८) दुपारी दोनच्या सुमारास रागाने घरातून निघून गेली होती. सायंकाळी उशिरापर्यंत तिचा पत्ता लागत नसल्याने पालकांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तिच्या ‘मिसिंग’ची जाहिरात व्हॉट्सअपवर व्हायरल केली. पुणेकरांनी ‘मिसिंग’ची जाहिरात व्हॉट्सअप स्टेटसला ठेवली. शिवाय, मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागली होती. पोलिसकाकाचे पत्रकार संदिप कद्रे यांनी पोस्ट पाहिल्यानंतर पुणे पोलिस दलातील विविध विभागांशी संपर्क साधला. शिवाय, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधून मदतीचे आवाहन केले. पोलिस आयुक्तांनी स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घातले. पुणे पोलिस रस्त्यावर उतरून मुलीचा शोध घेत होते.
मुलगी रांजणगाव गणपती येथील मंदिराजवळ असल्याचे समजल्यानंतर पोलिस आयुक्तांसह शेकडो पोलिसांचा फौजफाटा रात्री साडेअकरा वाजता रांजणगाव गणपती आणि वाघोलीमध्ये दाखल झाला होता. अखेर पोलिस आयुक्तांनीच तिचे बोलणे तिच्या आईशी व्हिडीओ कॉलवर करून दिले आणि आईसह हजारो पुणेकरांचा जीव भांड्यात पडला. पोलिस आयुक्तांनी तिला शोधून देणाऱ्यांना एक लाख रुपयांचे पारितोषिकही या वेळी जाहीर केले. एक सतर्क पोलिस अधिकारी म्हणून हरवलेल्या मुलीचा शोध घेण्यात पोलिस आयुक्त अमितेश कुमार व पोलिस कर्मचाऱ्यांना यश आले आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार ऍक्शन मोडवर; गुन्हेगारांमध्ये धडकी…
पुणे शहरात वाहन तोडफोड करणाऱ्यांची आता खैर नाही: अमितेश कुमार
पुणे शहरातील 85 प्रतिष्ठित व्यक्तींची सुरक्षा काढण्याचे अमितेश कुमार आदेश…
पुणे पोलिस आयुक्तांनी गुन्हेगारांना दिली तंबी…
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

