
पुणे शहरात युवतीने मित्रासोबत मिळून केला आईचा खून; कारण समोर…
पुणे : वडगाव शेरीत राहणाऱ्या मुलीने मित्रासोबत मिळून आईच्या डोक्यात हातोडा मारून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीने आईचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याचा बनाव रचला. पण नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी अधिक तपास केला असता हा खून असल्याची माहिती समोर आली आहे.
मंगल संजय गोखले या त्यांच्या मुलीसोबत वडगाव शेरी येथे राहत होत्या. त्यांची मुलगी योशिता संजय गोखले (वय १८) हिने तिचा मित्र यश मिलिंद शितोळे याच्योसबत मिळून आई मंगल यांचा खून केला. या प्रकरणी विनोद शाहू गाडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच योशिता हिने मित्राच्या मदतीने आपण आईचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले.
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
आई घरात झोपली असताना योशिताने आईचे तोंड उशीने दाबले. त्याचवेळी तिचा मित्र यशने डोक्यात हातोड्याने वार केला. आपला गुन्हा लपवण्यासाठी आई बाथरूममध्ये पाय घसरून पडली आणि गंभीर जखमी झाल्याचे योशिताने नातेवाईकांना सांगितले. मात्र मुलीच्या बोलण्यावरून नातेवाईकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.
योशिताने मित्राच्या मदतीने आईच्या खात्यातून न सांगता काही पैसे काढले होते. आईला हा प्रकार समजल्यास ती रागवेल या भीतीने योशिताने मित्रासोबत मिळून आईचा खून केला. पोलिस पुढील तपास करत आहेत.
कौर्याची परिसीमा! भाग्यश्रीचा खून करणारे जेरबंद; पाहा कसा केला खून…
विकृती! पुणे शहरात समोशात आढळल्या ‘नको त्या वस्तू’…
पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…
पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुणे जिल्ह्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

