आमदाराच्या पीएला रस्त्यावर खेचत केली बेदम मारहाण; कारण…

बीड: आमदार प्रकाश सोळंके यांच्या स्वीय सहाय्यकाला भर चौकात अमानुष मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणात सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बीडच्या माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचे स्वीय सहायक महादू सोळंके यांना भर चौकात बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजलगाव शहरांतील रंगोली कॉर्नरवर महादू सोळंके यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणात आता अजय सिंह राऊत, अभय राऊत, अशोक बाळासाहेब सोळंके, मेघराज अर्जुन सोळंके, यांच्यासह इतर तीन जणांविरोधात मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

मराठा आंदोलनादरम्यान माजलगावमध्ये जाळपोळ झाली होती. यामध्ये आमची नावं विनाकारण का गोवली? असा जाब विचारत आमदार सोळंके यांचे स्वीय सहायक महादू सोळंके यांना मारहाण करण्यात आली आहे. माजलगावातील रंगोली कॉर्नरवर हा हल्ला झाला. भाजपचे तालुकाध्यक्ष असलेले अरूण राऊत यांचे पुतणे अजयसिंह राऊत यांच्याकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘माझे नाव या जाळपोळीत विनाकारण का गोवले? माझ्यावर गुन्हा दाखल करतो का? मी जाळपोळीत होतो तरी का?’ असे म्हणत सलूनमध्ये शेवींग करत असलेल्या महादू सोळंके यांना बाहेर ओढत आणून मारहाण करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे या मारहाणीचे मोबाईलवर चित्रिकरणही करण्यात आले. या प्रकरणात आता सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे जिल्ह्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या…

पवित्र नात्याला काळिमा! शिक्षकाच्या फोनमध्ये सापडले 45 अश्लील व्हिडीओ…

महिलेची अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून हत्या अन्…

कुख्यात गँगस्टर अरुण गवळी कारागृहातून येणार कायमचा बाहेर…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!