नागपूरच्या विमानतळावरून कोट्यवधी रुपयांचा ड्रग्सचा साठा जप्त…

नागपूर : नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई केली असून, 2 किलो 937 ग्रॅम ड्रग्स जप्त केला आहे. 8 कोटी 81 लाख रुपये एवढी या जप्त केलेल्या ड्रग्सची किंमत आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे.

पोलिस दल, स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचय?

अमली पदार्थ तस्करी विरोधात सुरू असलेल्या मोहिमेतील ही सर्वात मोठी कारवाई आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील तस्कर हा तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथील रहिवासी आहे. हा 45 वर्षीय व्यक्ती युगांडाहून दोहा मार्गे कतार एअरवेची फ्लाइट क्र QR-590 ने पहाटे नागपूर विमानतळावर आला होता. कस्टमच्या अधिकाऱ्यांना ड्रग्स तस्करीबाबत आधीच माहिती मिळाली होती.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ड्रग्सचा मोठा साठा आढळून आला. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीकडून तब्बल 2 किलो 937 ग्रॅम ड्रग्स जप्त केले आहे. 8 कोटी 81 लाख रुपये एवढी या जप्त केलेल्या ड्रग्सची किंमत आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

विमानतळ पोलिसांनी सापळा रचून पिस्टल बाळगणाऱ्यास केले जेरबंद…

महिला ips अधिकाऱ्याचा पाठलाग करत राहिला अन् जाळ्यात सापडला…

पोलिसकाकाने गंभीर गुन्ह्यातील आरोपीला ठार करून घेतला शेवटचा श्वास…

हाय प्रोफाईल चोर! पुणे शहरात विमानाने येऊन चोरी करणारी टोळी गजाआड…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!