
माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जन्मठेप; पाहा कारकिर्द…
मुंबई : मुंबईचे माजी पोलिस अधिकारी आणि एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2006 च्या लखन भैया एन्काउंटर प्रकरणाशी संबंधित अनेक याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने आज (मंगळवार) निर्णय दिला आहे. प्रदीप शर्मा यांना तीन आठवड्यांत मुंबई सत्र न्यायालयापुढे शरण येण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने 8 नोव्हेंबर 2023 रोजी या 2006 मध्ये दाखल केलेल्या 16 अपीलांच्या सुनावणीवर निकाल राखून ठेवला होता.
कुख्यात गँगस्टर छोटा राजनचा सहकारी राम नारायण गुप्ता उर्फ लखन भैयाच्या बनावट चकमक प्रकरणी प्रदीप शर्मा दोषी असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणात 2013 मध्ये सेशन कोर्टाने 21 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. वसईत राहणाऱ्या लखन भैया विरुद्ध गँगस्टर ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 11 नोव्हेंबर 2006 रोजी मुंबई पोलिसांच्या पथकाने छोटा राजन टोळीचा संशयित सदस्य म्हणून त्याला ताब्यात घेतले होते. त्याच दिवशी संध्याकाळी लखन भैय्याचे पश्चिम मुंबईतील वर्सोवा येथे एन्काऊंटर झाले होते.
या इन्काऊंटरचं नेतृत्व माजी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी केले होते. ही एक कथित बनावट चकमक असल्याचा आरोप करत लखन भैयाच्या भावाने याच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. ज्या 2013 मध्ये मुंबईतील सत्र न्यायालयाने या प्रकरणात 13 पोलिसांसह 21 जणांना दोषी ठरवले आणि सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात न्यायालयाने प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठासमोर चकमक प्रकरणातील दोषींनी दाखल केलेल्या अपीलांवर सुनावणी सुरू होती.
लखन भैय्याचा भाऊ आणि वकील राम प्रसाद गुप्ता यांनी प्रदीप शर्माच्या निर्दोष सुटकेविरोधात अपील दाखल करून दोषींच्या शिक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी न्यायालयाने आपला आदेश राखून ठेवला होता. या प्रकरणात प्रदीप शर्मा यांच्या निर्दोष सुटकेविरोधात राज्य सरकारने याचिकाही दाखल केली होती. राज्य सरकारने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील राजीव चव्हाण यांनी प्रदीप शर्मा यांच्या निर्दोष सुटकेच्या विरोधात युक्तिवाद केला होता.
दरम्यान, अंडरवर्ल्डमधील गुंडांचा कर्दनकाळ अशी ओळख असणारे एन्काऊंटर फेम प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रदीप शर्मा यांची पोलिस दलातील कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. त्यांनी केलेले काही एन्काऊंटर वादग्रस्त राहिले. व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटिलिया बॉम्ब प्रकरणी प्रदीप शर्मा यांनी अटकही करण्यात आली होती, त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला होता. 2019 मध्ये त्यांना मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश घेत नालासोपाऱ्यातून निवडणूक लढवली होती.
कोण आहेत प्रदीप शर्मा?
प्रदीप शर्मा 1983 मध्ये पोलिस दलात दाखल
अत्यंत वादग्रस्त कारकिर्द
लखन भैय्या बनावट एन्काऊंटर आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध प्रकरणात 2008 मध्ये निलंबित
2019 मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवली
अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात तुरुंगवास, ऑगस्ट 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन
माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर…
न्यायाधीशांना दोन बोटांनी सॅल्यूट; पोलिस अधिकाऱ्यावर कारवाईचे निर्देश…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

