
लातूरमध्ये जन्मदात्या आईवर कोयत्याने केले तब्बल 75 वार अन्…
लातूर : संपत्तीसाठी पोटच्या मुलानेच आईचा (वय ५५) खून केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यात घडली असून, एकच खळबळ उडाली आहे. आईच्या अंगावर कोयत्यानं तब्बल 70 ते 75 वार करून तिच्या शरीराचे तुकडे केले होते. अखेर पोलिस तपासात याचा उलगडा झाला आहे.
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर ग्रामीण पोलिस ठण्याच्या हद्दीत हॉटेल व्यावसाय करणाऱ्या सखुबाई वाघमारे या महिलेचा अत्यंत निर्दयी आणि क्रूरपणे खून करण्यात होता. महिलेच्या अंगावर तब्बल 70 ते 75 कोयत्याचे वार होते. संबंधित घटना 24 फेब्रुवारी रोजी घडली होती. त्यानंतर आरोपीचा शोध घेऊनही आरोपी मिळत नव्हते, तेव्हा पोलिसांनी मयत सखुबाई वाघमारे यांचा मुलगा नागनाथ वाघमारे याची कसुन चौकशी केली असता प्रॉपर्टीसाठी आईच्या अंगावर कोयत्याने 70 ते 75 वार करून तिचा खून करून तिच्या अंगावरचे सर्व कपडे काढून टाकून पुरावे नष्ट केल्याची धक्कादायक कबूली दिली. कोणीतरी बलात्कार करून खून केला असावा असा अंदाज पोलिस करतील आणि माझ्यावर संशय येणार नाही. त्यामुळे हा बनाव केल्याचे देखील आरोपी नागनाथ वाघमारे याने कबुल केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून, आरोपी मुलाविरोधात कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
लातूर हादरले! दोन सख्ख्या चुलत भावांची हत्या…
लहान भावानेच केला मोठ्या भावाचा खून; कारण आले पुढे…
हृदयद्रावक! चूक कोणाची? आई मला जगायचं गं…
अल्पवयीन मुलीवर एकाच दिवसात दोन वेळा अत्याचार…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

