महाराष्ट्र पोलिस भरती ऑनलाइन अर्ज 5 मार्चपासून; पाहा सविस्तर माहिती…

मुंबई : मराठा समाजाच्या १० टक्के आरक्षणाचा शासन निर्णय होताच गृह विभागाने राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये एकूण १७ हजार पोलिस पदांची (चालक व शिपाई) भरती काढली आहे. ५ ते ३१ मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत.

राज्यातील विविध शहर-जिल्ह्यांची वाढलेली लोकसंख्या व विस्तार, गुन्हेगारीतील वाढ, नवीन पोलिस ठाण्यांचे प्रलंबित प्रस्ताव, सध्याची सामाजिक स्थिती या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडील सध्याचे मनुष्यबळ कमी पडत असल्याची वस्तुस्थिती आहे. सेवानिवृत्त कर्मचारी, अपघाती मृत्यू, स्वेच्छानिवृत्ती अशा कारणांमुळे पण पोलिसांची पदे रिक्त झाली आहेत.

या पार्श्वभूमीवर बरोबर १२ महिन्यांत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरी मोठी पोलिस भरती आता होत आहे. यापूर्वी १८ हजार पदांची झाली असून आता १७ हजार पदांची भरती केली जात आहे. दरम्यान, उन्हाळा संपल्यानंतर जून-जुलैमध्ये सध्याच्या भरतीला सुरवात होईल. तत्पूर्वी, उमेदवारांकडून ३१ मार्चपर्यंत अर्ज भरून घेतले जाणार आहेत. पहिल्यांदा मैदानी व शेवटी लेखी परीक्षा होणार असून परीक्षेच्या निकालानंतर नोव्हेंबरमध्ये या निवड झालेल्या नवप्रविष्ठांचे प्रशिक्षण सुरु होईल.

या बावतची सविस्तर माहिती www.mahapolice.gov.in/police-recruitment आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर उमेदवारांच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात आलो आहे.
उमेदवारास पोलिस आयुक्त / पोलिस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलिस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल, ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.
उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करु शकतो.
उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द होईल
पोलिस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा घेण्यांत येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा हो सर्व पोलिस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यांत येईल
त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाव विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.
भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारिरीक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या १:१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे.लेखी परीक्षेमध्ये ४० टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
सर्व पोलिस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची वाव विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा
शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधुन एक गुणवत्तायादी तयार केली जाईल.
तात्पुरत्या निवडसूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवडसूचीमध्ये समावेश केला जाईल.
निवडसूचीतील उमेदवाराची निवड तात्पुरती (Provisional selection) असेल, शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रिकरण केल्यानंतर, गृहविभाग शासन निर्णय, दि.१०.१२.२०२० नुसार अंतिम गुणवत्तावादी तयार करण्यांत येईल.
पोलिस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शेक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणावायची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्यावाचलची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2024. mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत.
सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी, तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या ११७ आरक्षित
जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.
भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये निश्चित केलेल्या दिनांकास उमेदवार गैरहजर राहिल्यास, त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येईल
कार्यालयाने एकदा निश्चित केलेल्या दिनांकामध्ये कोणत्याही परीस्थितीत बदल करण्यात येणार नाही.
उमेदवारांनी संकेतस्थळावर जावून आवेदन अर्ज सादर करावयाचा आहे, त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवाराने अर्ज सादर करावेत, मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात (Unreserved) अर्ज करु शकतात
परंतू खुल्या प्रवर्गातील (Unreserved) उमेदवार मागासवगीय प्रपांत अर्ज करु शकणार नाहीत
पदोन्नतीवरील आरक्षणासंदर्भात शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ बाबात होणान्या अंतिम निर्णयाच्या आदेशाच्या अधिन राहून व उच्च न्यायालय, मुंचई यांनी जनहित याचिका क्रमांक १७५/२०१८ व इतर संलग्न याचिकांमध्ये दिनांक २७.०६ २०११ रोजी दिलेल्या निर्णयाविरुद मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेबाचत होणान्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून रिका पदांची गणना केलेली आहे.
त्यामुळे जाहीरातीमध्ये नमूद केलेल्या रिक्त पदांच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो व त्याची माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानुसार नियुक्ती अधिकारी यांना पदे भरण्याचा अधिकार आहे.
अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी – www.mahapolice.gov.in

अशी होणार नवीन पदभरती
पदनाम भरतीतील पदे
जेल शिपाई – १,९००
एमआरपीएफ – ४,८००
पोलिस शिपाई – १०,३००
एकूण – १७,०००

ठळक बाबी…
– राज्यातील १० पोलिस प्रशिक्षण केंद्रात २६ फेब्रुवारीपासून सहा हजार नवप्रविष्ठ पोलिसांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षण संपल्यावर नवीन भरती झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल.
– जून-जुलैमध्ये सर्वांचीच एकाचवेळी परीक्षा होईल. पहिल्यांदा मैदानी, त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. उन्हाळ्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी जून-जुलैमध्ये घेतली जाणार आहे.
– राज्यातील सर्वच प्रशिक्षण केंद्रांची क्षमता वाढणार असून पूर्वी १० प्रशिक्षण केंद्रांची क्षमता सहा हजार होती. मागच्यावेळी ही क्षमता आठ हजार ६०० झाली, आता सरकारच्या मान्यतेने आणखी पाच हजाराने क्षमता वाढणार आहे.

राज्यात 17471 पोलिसांची होणार भरती…

राज्यात होणार 23 हजार 628 पोलिस शिपयांची पदभरती: गृहमंत्री

महाराष्ट्र गृह विभागाचा पोलिसांना मोठा दिलासा…

जेनिफर अँड द बीस्ट पुस्तकाचे प्रकाशन! पोलिसांनी लेखनातून व्यक्त व्हावे: अशोक धिवरे

पोलिस अधिकाऱ्यांच्या मिरवणुका, फेटे बांधणे, पुष्पवृष्टीवर बंधने…

राज्यातील पाच उपायुक्तांसह 15 एसीपींच्या बदल्या; पाहा नावे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!