
पुणे शहरात बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी बाल गुन्हेगार व पालक मेळावा…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून बाल गुन्हेगारी वाढली असल्याचे दिसत आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाय योजनांबरोबरच पालक मेळावा घ्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमिवर परिमंडळ ०५ कार्यक्षेत्रांत बाल गुन्हेगार व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरांत अलीकडे घडणारे गंभीर गुन्हयाचा आढावा घेतला असता असे निदर्शनास आले की, सध्या बाल गुन्हेगारांकडून वारंवार गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडत बहुतांश गंभीर गुन्हयांमध्ये बाल गुन्हेगारांचा सहभाग आढळून येत आहे. बाल गुन्हेगारांकडून होत असलेल्यां गंभीर गुन्हयांसंबंधाने आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक असलेने सर्व पोलिस स्टेशनकडून अभिलेखावरील बाल गुन्हेगारांचा व त्यांचे पालकांचा मेळावा आयोजित करणेत यावा. तसेच सदर मेळाव्यांमध्ये जास्तीत जास्त बाल गुन्हेगार व पालक यांना उपस्थित सहभागी करुन घेवून त्यांचे समुपदेशन / कॉन्सलिंग हे खाजगी कॉन्सलर यांचेकडून करणेबाबत आदेश दिलेले होते.
पोलिस आयुक्त यांचे प्राप्त आदेशांन्वये परिमंडळ -५ कार्यक्षेत्रातील स.पो.आ.वानवडी व हडपसर विभागातील वेगवेगळया पो.स्टे. कडील एकूण ६८ बाल गुन्हेगार व ७६ पालक यांना मेळाव्यांमध्ये सहभागी करुन घेवून बाल गुन्हेगारांना गुन्हे करणेपासून त्यांचे मन परावृत्त करणेबाबत समुपदेशन करणेत आलेले आहे. तसेच १० वी व १२ वी शिक्षण घेत असलेले बाल गुन्हेगारांना त्यांचे पुढील उज्वल भवितव्यांचे दृष्टीने शिक्षण किती महत्वाचे आहे याबाबत माहिती व संदेश देवून त्यांना पुढे गुन्हे न करणेबाबत आवाहन करणेत आलेले आहे.
सदरचा मेळावा पोलिस आयुक्त रितेश कुमार, रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, आर राजा, पोलिस उप आयुक्त परिमंडळ ०५ पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनांप्रमाणे परिमंडळ-५ चे विभागीय सहा. पोलिस आयुक्त शाहुराजे साळवे, वानवडी विभाग, पुणे शहर व अश्विनी राख, हडपसर विभाग, पुणे शहर यांनी व त्यांचे विभागीय पो.स्टे. कडील प्रभारी अधिकारी व बाल स्नेही अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी केलेली आहे.
कुख्यात गुंड शरद मोहोळ प्रकरण! पोलिसांनी आवळल्या आठही जणांच्या मुसक्या…
पोलिसकाकावर हात उचलणं भाजप आमदार सुनील कांबळे यांना भोवलं…
भारती विद्यापीठ पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या बंटी बबलीचा केला पर्दाफाश…
एमपीडीए ७६! हडपसरमधील अट्टल गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

