
धक्कादायक! चुलत्याचे मुंडके दुचाकीवर ठेवून गावभर फिरत राहिला…
सोलापूर : जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीचे घाव घालून चुलत्याचा खून करून मुंडकं दुचाकीवर घेऊन फिरणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजी जाधव असे आरोपीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
आरोपी शिवाजी जाधव याने जमिनीच्या वादातून त्याचे काका शंकर जाधव यांचा खून केला. त्यांचे मुंडकं तोडून तो दुचाकीवर ठेऊन फिरत होता. अखेर अकलूज रोडवर माळीनगर इथे तो शरण गेला. या प्रकारामुळे माढा तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माढा तालुक्यातील शेवरे येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून त्याने चुलत्याचे थेट मुंडके धडावेगळे केले आणि तेच मुंडके घेऊन तो दुचाकीवरून गावभर फिरत होता. यानंतर त्याने अकलूज रोडवर माळीनगर येथे मुंडके व दुचाकी सोडून अकलूज पोलिसात शरण गेला. या प्रकाराने मात्र परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
शंकर प्रल्हाद जाधव (वय 65) (शेवरे, माढा) असे खून झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणातील आरोपी नराधम शिवाजी जाधव या पुतण्याने हत्या केल्याचे समजताच त्याच्या तपासला विविध पथके पाठवण्यात आली होती. पोलिस पाठावल असल्याचे लक्षात येताच त्याने माळीनगर जवळ चुलात्याचे मुंडके आणि मोटार सायकल टाकून दिली. त्यानंतर अकलूज पोलिस ठाण्यात शरण गेला. अकलूज पोलिसांनी चुलत्याचे मुंडके, दुचाकी ताब्यात घेतली आहे. याबाबत मयताचा नातू नरहरी नवनाथ बंडलकर (वय २३, रा.कुरण वस्ती-शेवरे, ता. माढा) याने टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.
हृदयद्रावक! पुणे-सोलापूर महामार्गावर दोन सख्या भावांचा अपघाती मृत्यू…
सोलापुरात शिकाऊ डॉक्टरची रेल्वेसमोर उडी, शरीराचे झाले दोन तुकडे…
पोलिसकाकाची घराच्या अंगणात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…
एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन युवतीचा घेतला जीव…
शिक्षक कारचे पेढे वाटण्यासाठी गेले अन् कार कोसळली विहिरीत…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

