
पुणे! निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचा मृत्यू, इमारतीच्या आवारात सापडला मृतदेह…
पुणे : भारतीय लष्करातील निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी (वय ९०) यांचा मृत्यू झाला आहे. निवासस्थानाच्या गच्चीवरुन पडून त्यांची प्राणज्योत मालवली असल्याची माहिती आहे. त्यांच्या मागे मुलगी आणि जावई असा परिवार आहे. या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद कोंढवा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 1965 आणि 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धांमध्ये सहभागी झालेले आणि ‘डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ट्रेनिंग’ म्हणून त्यांनी काम पाहिले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक जोशी हे पुण्यातील साळुंखे विहार परिसरात एका निवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहत होते. बुधवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास अशोक जोशी यांनी, “थंडी जाणवू लागल्याने ऊन घेण्यासाठी ते गच्चीवर जात आहेत” असं त्यांनी त्यांच्या घरकाम करणाऱ्या व्यक्तीला सांगितले होते. काही वेळाने इमारतीतील रहिवाशांना ते आवारात पडलेले दिसले. त्यांनी जोशींकडे घरकाम करणाऱ्या व्यक्तीला तात्काळ माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या मुलीने धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
View this post on Instagram
पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, या घटनेच्या नेमक्या परिस्थितीचा तपास करण्यासाठी त्यांच्या मुलीचा जबाब नोंदवून घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, जोशी यांच्या मुलीचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना यापूर्वी चक्कर येण्याचा त्रास होत असे आणि ते घरी काही वेळा पडलेही होते. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, या घटनेच्या नेमक्या परिस्थितीचा तपास करण्यासाठी त्यांच्या मुलीचा जबाब नोंदवून घेतला असल्याचे समोर आलं आहे. “त्यांच्या मुलीने आम्हाला सांगितले की, त्यांना पूर्वी चक्कर येण्याचा त्रास होत असे आणि ते घरी काही वेळा पडलेही होते. त्यांच्याकडे गेल्या आठ वर्षांपासून काम करणाऱ्या व्यक्तीबद्दल कुटुंबाला कोणतीही शंका नाही. आम्ही नियमांनुसार पुढील चौकशी करु” असे देखील पोलिसांनी सांगितले आहे.
बांगलादेश सीमेवर बीएसएफ जवानांवर त्रिपुरामध्ये हल्ला; शस्त्रांची लूट; कंपनी कमांडरसह ४ जण जखमी…
माजी जवान चंदू चव्हाण यांच्या विरुद्ध पुन्हा गुन्हा दाखल….
नाशिक जिल्ह्यातील जवानावर काळाने घातला घाला; 15 दिवसांपूर्वीची भेट ठरली अखेरची…
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाला अपघात; 10 जवानांचा मृत्यू…
सातारा! जवान विकास गावडे यांना पाणी पाजतानाचा क्षण काळजात चर्रर्र करून गेला…
सातारा सुन्न! एकीकडे पत्नी बाळाला जन्म देत होती अन् दुसरीकडे जवानाचा मृत्यू…

