अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यातील आरोपींकडून धक्कादायक गोष्टी समोर…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ला प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 10 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात पोलिस चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.

अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबाराच्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई गुन्हे शाखेला, बुधवारी अटक करण्यात आलेला अंकित आणि याआधी अटक झालेले शूटर, फूल सिंह, रेहान आणि ऋतिक, यांच्या चौकशीतून एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. या आरोपींनी अनेक अभिनेत्यांच्या घराची आणि ऑफिसची रेकी केली होती. त्यानंतर त्यांनी टायगर श्रॉफला टार्गेट करण्याचे ठरवले. तसेच, मुंबईजवळच्या एका ठिकाणी बंदुकीतून गोळ्या झाडण्याचा सरावही केला होता. शिवाय, अंधेरीतील एका हॉटेलमध्ये आरोपींकडून चुकून गोळीसुद्धा चाललेली.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पोलिसांच्या चौकशीदरम्यान, त्यांनी ज्या ठिकाणी बंदुकीची चाचणी केली होती, त्या जागेबद्दलची माहिती दिली. बंदूक व्यवस्थित काम करत असल्याची खात्री करण्यासाठी एका आरोपीनं दोन, तर दुसऱ्या आरोपीनं एक गोळी झाडली होती. याव्यतिरिक्त, अंधेरीतील एका हॉटेलच्या खोलीत असताना, आरोपी बंदुकीची तपासणी करत असताना ती चुकून फायर झाली आणि गोळी थेट बेडवर लागली. पण, हॉटेलचे कर्मचारी किंवा इतर कोणालाही कोणताही संशय आला नाही. आता या माहितीच्या आधारे पोलिस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, हल्ल्यासाठी ‘डेड लेटर बॉक्स’ पद्धतीनं शस्त्र पुरवण्याचे ठरले. ज्यामुळे आरोपांची ओळख पूर्णपणे गुप्त राहते. दिल्लीतून मुंबईत पिस्तुल घेऊन येणारी आरोपी राधा ही आरोपी अंकितची प्रेयसी असल्याचे उघड झाले आहे. कुणालच्या सांगण्यावरूनच राधा मुंबईत पिस्तुल घेऊन येण्यास तयार झाली असे समोर आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

टायगर श्रॉफ नव्हे, तर सलमान खान हाच होता हल्लेखोरांचे खरे लक्ष्य; सलमान खानच्या सुरक्षेत वाढ…

टायगर श्रॉफच्या मारेकऱ्यांसाठी उत्तर प्रदेशातील दोन महिलांनी मुंबईत बंदुका आणल्या; कशा ते वाचा…

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाबाबत पोलिस उपायुक्तांकडून महत्त्वाची माहिती…

टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्या तिघांनाही कोटामध्ये अटक; आरोपींपैकी एक जण बिहारचा तर दोघे हरियाणाचे…

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणी राजस्थानात एका संशयिताला अटक; हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल…

Video : गोळीबारात टायगर श्रॉफचा जीव कसा वाचला? धक्कादायक माहिती आली समोर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!