
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाबाबत पोलिस उपायुक्तांकडून महत्त्वाची माहिती…
मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना राजस्थानच्या कोटा शहरातून मुंबईत आणण्यात येत आहे. त्यानंतर, पोलिस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
जुहूमध्ये अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या कारवर काल (रविवार) गोळीबाराची घटना घडली, दुचाकीवरुन आलेल्या तिघांपैकी दोघांनी गोळीबार केला आणि ते घटनास्थळावरुन पळून गेले. या आरोपींची दुचाकी आम्हाला अंधेरी रेल्वे स्थानकावर मिळाली. त्यानंतर, आम्ही पुढे फॉलोअप करत गेलो, आणि पुणे-जयपूर एक्सप्रेसने ते पुढे गेले. आम्ही माहिती काढून, ते कोणत्या बोगीत आहेत, याची माहिती जयपूर पोलिसांना दिली. त्यानंतर, आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी दिली.
View this post on Instagram
मुंबईतून पळून गेलेल्या आरोपींच्या मागे आमची टीम होती, आमची टीम त्यांच्यापर्यंत पोहचली आणि ताब्यातही घेतले, हा तपास सुरूच आहे, हे खंडणीप्रकरण आहे. तसेच, हत्येच्या प्रयत्नाचा देखील गुन्हा आहे. याप्रकरणी, आम्ही कारवाई करत असून आरोपींकडे दोन वेपन होते, त्यातून 5-6 फायर झाले आहेत. आम्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. आता, फक्त प्राईमा इंट्रोगेशन सुरूच आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी दिली.
सध्या व्हायरल ऑडिओ क्लीप आणि त्या पोस्ट फिरत आहेत, त्याचं व्हेरिफिकेशन बाकी आहे , एकदा ते व्हेरीफाय झालं की मगच सांगता येईल. मागच्या केसेसमध्ये MCOCA झालेली आहे, असे म्हणत बिश्नोई गँगबाबत पोलिसांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही कायदेशीर प्रोसेसमध्ये आहोत, SOP फॉलो करण्याचं काम सुरूच आहे. आम्ही प्राईमा फेसमध्ये आहोत, आम्ही तिन्ही आरोपी पकडले आहेत. या घटनेतील कोणीही आरोपी अल्पवयीन नाही, अशी माहिती देखील पोलिसांनी दिली. आम्हाला दिल्ली पोलिस, राजस्थान पोलिस, गुजरात पोलिस यांची मदत मिळाली आहे. आम्हाला जे पुढे चौकशीत येईल, ज्यांची नावे येतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सध्या, आरोपींकडे दुचाकी कोठून आली, कशी आली याची ही चौकशी सुरू आहे, असेही रोशन यांनी सांगितले.
दोन आरोपी बिहारमधील सोनीपतचे असून एक बिहारचा आहे. त्यापैकी, एकाचे शिक्षण बारावी तर एकाचे आठवी शिक्षण आहे. दोन आरोपी एकमेकांना ओळखत होते, तिसरा आरोपी त्यांच्या संपर्कात कसा आला याची चौकशी आम्ही करू, असे पोलिसांनी म्हटले आहे.
View this post on Instagram
टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्या तिघांनाही कोटामध्ये अटक; आरोपींपैकी एक जण बिहारचा तर दोघे हरियाणाचे…
टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणी राजस्थानात एका संशयिताला अटक; हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल…
Video : गोळीबारात टायगर श्रॉफचा जीव कसा वाचला? धक्कादायक माहिती आली समोर…

