
ट्रकने पिकअप व्हॅनला दिलेल्या धडकेत धामणगावजवळ ५ प्रवासी मृत्यूमुखी…
अमरावतीः अमरावती जिल्ह्यातील धामणगावजवळ एका भरधाव ट्रकने बोलेरो पिकअप व्हॅनला दिलेल्या धडकेत, पिकअपमधील पाच प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, धामणगाव रेल्वे स्टेशनजवळ समृद्धी एक्सप्रेसवेच्या चॅनल ९७ वर दुपारी १२.४५ वाजता हा अपघात झाला. ट्रकने पिकअप व्हॅनला मागून धडक दिल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आणि २१ जण जखमी झाले आहेत.
जखमींना प्रथम धामणगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर वर्धा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

